आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्यांनी पुन्हा डिवचलं

आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्यांनी पुन्हा डिवचलं

मुंबई हायकोर्टाच्या निर्णय आणि कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प आखणी रखडणार आहे. आता याला कोण जबाबदार?

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं (metro car shed kanjurmarg) काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) MMRDA ला दिले आहे. तर कारशेडच्या जागेची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश देऊन न्यायालयानं उद्धव ठाकरे सरकारला फटकारलं आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav thackeray)आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

हेही वाचा... आता हायकोर्टाचा तरी निर्णय मान्य करणार का? भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला सवाल

आदित्य ठाकरे यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर ट्वीट केलं आहे. 'आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हे खरं आहे.' अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यावर किरीट सोमाय्या यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले , ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावी लागली. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करण्यापेक्षा न्यायालयात बोलायचं होतं. ते बालिश आहेत, अशा शब्दांत जहरी टीका किरीट सोमाय्या यांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकारनं जनतेची माफी मागावी, अशी देखील मागणी किरीट सोमाय्या यांनी केली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या निर्णय आणि कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प आखणी रखडणार आहे. आता याला कोण जबाबदार? असा सवालही किरीट सोमाय्या यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील 800 एकर जागा जंगल म्हणून घोषित केलं होतं. नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील आरेतील प्रस्तावित कारशेड हे कांजूरमार्गला हलवण्यात आले होतं. कांजूरमार्गमध्ये कारशेडचे काम सुद्धा सुरू झालं आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. ही जागा केंद्राची असल्याचा दावा देखील भाजपनं केला होता. या प्रकरणी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.

हेही वाचा..."टू मच डेमोक्रॉसी" उर्मिला मातोंडकर यांची मोदी सरकारवर तिखट शब्दात टीका

मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कारशेडच्या जागेची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. आता ठाकरे सरकार काय भूमिका घेतं, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 16, 2020, 2:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या