मुंबई, 10 ऑगस्ट : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये कोरोना रुग्णांची बाधा झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. अद्याप ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांची पत्नी मेधा सोमय्यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
Me & My Wife Prof Dr Medha Somaiya are tested COVID Positive. Both r hospitalized, treatment started
यानंतर गेल्या काही दिवसांत किरीट सोमय्या हे कोणकोणत्या भागात गेले होते आणि त्यांच्यासोबत कोण होतं याचा तपास सुरू करण्यात येणार आहे. शिवाय त्यांचासोबत असलेल्या नेत्यांना क्वारंटाईन करण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन आपण कोरोना पॉझिटिव्ह आसल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रुग्णांना दिली जाणारे उपचार, पावसामुळे नागरिकांचे होत असलेले हाल त्याशिवाय ज्यादा वीज बिल या विषयांवरुन किरीट सोमय्या सद्याच्या सरकारवर टीका करीत आहेत.