मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर भाजप नेते आक्रमक, केली जोरदार टीका

मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनावर नाराजी व्यक्त करत भाजपने जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनावर नाराजी व्यक्त करत भाजपने जोरदार टीका केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करत कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनावर नाराजी व्यक्त करत आता भाजपने जोरदार टीका केली आहे. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे निराश करणारे फेसबुक लाईव्ह. जनतेच्या नाराजीची दखल न घेता जनतेवरच नाराजी व्यक्त करणारे...वीजबिलाबाबत काहीही दिलासा नाही...शेतकऱ्यांना काही मदत नाही...राज्यातील समस्यांवर काही उपाय नाहीत....ना ठोस कृती ना उपाय,' असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. दुसरीकडे, भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 'जनतेला पोटभर सल्ले दिले, सरकार काय करणार त्याबाबत मात्र मुख्यमंत्र्यांचे नेहमीप्रमाणे मौन...तेच तेच आणि तेच...म्हणजेच तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी...मी राहतो कायम घरी,' असा टोला भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published: