Home /News /mumbai /

भाजपला आणखी एक धक्का, शरद पवारांच्या उपस्थितीत माजी मंत्र्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपला आणखी एक धक्का, शरद पवारांच्या उपस्थितीत माजी मंत्र्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

'चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट केला जातोय. नितीन गडकरी यांचे काय हाल सुरू हे सगळ्यांना माहिती आहे. काही खुकांर लोकांनी भाजपचा ताबा घेतला आहे'

    मुंबई, 24 नोव्हेंबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यानंतर आता भाजपला (BJP)आणखी धक्का बसला आहे.  बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड (Jaysingh gaikwad) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने भाजपने धक्का दिला आहे. मागील आठवड्यात जयसिंग गायकवाड यांनी बंडाचे निशाणा फडकवून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर जयसिंग गायकवाड यांनी पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुद्धा सुरू केला होता. अखेर आज मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.  जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडचे खासदार तसेच पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली. 'ज्या पक्षात कसा राहू जो मान सन्मान नाही, चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट केला जातो. नितीन गडकरी यांचे काय हाल सुरू हे सगळ्यांना माहिती आहे. काही खुकांर लोकांनी भाजपचा ताबा घेतला आहे, अशी विखारी टीका गायकवाड यांनी केली. 'जिथे कोंडमार होतो तिथ राहण्यात काहीच अर्थ नाही. आता मोकळा श्वास घेत आहे. आम्ही भाजपात आंदोलनं केली, मार खाल्ला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, आणि काही नेते हे आयत्या पिठावर रेगोट्ट्या मारतात. हे तर नव्हतेच त्याचा बाप ही नव्हता', असं म्हणत गायकवाड यांनी कुणाचेही नाव न घेता टीका केली. तर सामान्य माणसासमवेत नाळ असणारा सतत लोकात असणारे जयसिंग राव हे नेते आहे. सत्ता विनम्र स्विकारायची असते तस वागायचे असते, असं म्हणत शरद पवार यांनी गायकवाड यांचं कौतुक केलं. तसंच, 'महाराष्ट्रात वेगळे पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत आहे. राज्यातील प्रत्येक घटकासोबत घेत काम करत आहे,
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या