Elec-widget

शिखर बॅंक घोटाळ्याशी पवार साहेबांचा काय संबंध? एकनाथ खडसेंनी केली पाठराखण

शिखर बॅंक घोटाळ्याशी पवार साहेबांचा काय संबंध? एकनाथ खडसेंनी केली पाठराखण

ऐन विधानसभोच्या तोंडावर ईडी गुन्हा दाखल केल्याने महाराष्ट्र शिखर बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे.

  • Share this:

मुंबई,25 सप्टेंबर:महाराष्ट्र राज्य सहकारी अर्थात शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणाशी देणे घेणे नसणाऱ्यांवर गुन्हे कसे, असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी एका प्रकारे शरद पवार यांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनीच हे प्रकरण उघडकीस आणले होते. तेव्हा एकनाथ खडसे हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते.

शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात पवारांचे नाव समोर आल्यामुळे एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शरद पवार यांचे नाव जबरदस्ती प्रकरणात गोवून गुन्हा दाखल करणे म्हणजे समजायला मार्ग नाही. या प्रकरणाशी ज्यांचा काही संबंध नाही, देणे घेणे नाही त्यांच्या नावाने ईडी कसे काय गुन्हा दाखल करते, असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार यांच्या अडचणीत वाढ..

दरम्यान, ऐन विधानसभोच्या तोंडावर ईडी गुन्हा दाखल केल्याने महाराष्ट्र शिखर बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत यामुळे वाढ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनीही पवारांचे नाव या प्रकरणात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

मी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाणार..

Loading...

'मी स्वत:हून ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांना माहिती द्यायला तयार आहे,' असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण 27 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती दिली आहे. 'मी आयुष्यात कधी सहकारी बँकेत कधी संचालक नाही, ईडीने काय तपस करायचा तो करावा,' असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.

राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मला 1980 साली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत अटक झाली. त्यानंतर आता कारवाईची ही दुसरी घटना आहे. ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. एक महिना निवडणूक प्रचारसाठी मी महाराष्ट्रभर जाणार आहे. त्यामुळे या काळात मी मुंबई बाहेर असेल. जर ईडीला मला संदेश पाठवायचा असेल तर मी 27 सप्टेंबर ला स्वतः जाईल आणि ईडीचा काही पाहुणचार असेल तो देखील घेईल,' असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पवारांवरील कारवाईवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'बँक घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार सूडबुद्धीने अशा प्रकारची कारवाई करत नाही. महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. त्यामुळे ज्याला राजकारण कळतं ते सांगू शकेल की राज्य सरकार असं काही करणार नाही,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

VIDEO:आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...