एकनाथ खडसे काही महिन्यांपासून संपर्कात, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार हे बीडचा दौरा अर्धवट सोडून आज नाथाभाऊंच्या भेटीसाठी गेले त्यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 03:19 PM IST

एकनाथ खडसे काही महिन्यांपासून संपर्कात, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अजित मांढरे, ठाणे 03 ऑक्टोंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ED प्रकरणानंतर आता आक्रमक झालेत. आज ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय आणि एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले एकनाथ खडसे हे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात आहेत. मात्र त्यांचं पक्षात येण्याबाबात अजुन निश्चित काही सांगता येत नाही. ते काय पर्याय शोधतील हे आत्ताच काही सांगता येत नाही. पर्याय हा लगेच तयार होत नसतो. पवारांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार हे बीडचा दौरा अर्धवट सोडून आज नाथाभाऊंच्या भेटीसाठी गेले त्यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

मावळमध्ये राष्ट्रवादीचा पलटवार, भाजपला मोठा धक्का

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी उपस्थित राहण्यासाठी खास पवार ठाण्यात आले होते.विद्यार्थी नेते कन्ह्यय्या कुमारही खास जितेंद्र आव्हाढ यांच्यासाठी बिहारमधून ठाण्यात आले होते. आव्हाढ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

राज्याच्या राजकारणाला कलाटणी, बीडचा दौरा रद्द करून अजित पवार खडसेंच्या भेटीला?

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरील गुन्हे लपवले. याबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट आहे हे खरं आहे. मात्र त्यांनी दिली पाहिजे होती. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली जातेय. कलम 370 आणि राम मंदीर मुद्दा सत्ताधारी निवडणुकीच्या वेळीच काढतात. कारण लोकं त्यांच्यावर नाराज असतात तेव्हा भावनिक मुद्दे काढले जातात. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे अनेक मुद्द आहेत ज्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे असे मुद्दे काढले जातात. EDच्याअधिका-यांना वरुन सुचना आल्या असतील असंही पवार म्हणाले.

Loading...

नवी खलबतं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचा आपला नियोजित बीड दौरा रद्द केला. त्यानंतर आता अजित पवार भाजपचे दिग्गज नेते आणि सध्या पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी जळगावला रवाना झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही. मात्र जर खरोखरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असतील तर विधानसभा निवडणुकीना वेगळी कलाटणी मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...