Home /News /mumbai /

तासाभरात एकनाथ खडसे परतले भाजपमध्ये, मोदींवर निशाणा साधला खरा पण...

तासाभरात एकनाथ खडसे परतले भाजपमध्ये, मोदींवर निशाणा साधला खरा पण...

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

    मुंबई, 21ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. एवढंच नाहीतर 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेशही निश्चित मानला जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी मोदींवर केलेला टीकेचे ट्वीट रिट्वीट करून एकच खळबळ उडवून दिली. पण, तासाभरातच त्यांनी माघारही घेतली. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर असल्याच्या वृत्ताला आज खुद्द खडसे यांनीच दुजोरा दिला होता.  त्याचे झाले असे की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती अजून टळली नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 'आपल्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला' अशी टीका करणारे ट्वीट जयंत पाटील यांनी केले होते. आता जयंत पाटलांचे हेच ट्वीट एकनाथ खडसे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून रिट्वीट केले होते.  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचे ट्वीट रिट्वीट केल्यामुळे एकाप्रकारे एकनाथ खडसे यांनी समर्थन केले, असल्याचं निष्पन्न झाले. या ट्वीटमुळे खडसे हे राष्ट्रवादीवासी झाल्याचे शिक्कामोर्तब झाले होते. पण, ही बातमी सर्वत्र पसरताच एकनाथ खडसे यांनी अवघ्या तासाभरात माघार घेतली. जयंत पाटील यांचे रिट्वीट केलेले ट्वीट हे खडसे यांनी डिलीट करून टाकले आहे. ट्वीट डिलीट करून खडसे यांनी या वादावर तुर्तास पडदा टाकला आहे.  पण, राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि त्याची तारीख याबद्दल खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याने माहिती दिली. 'एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,' असं या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या