Home /News /mumbai /

मोठी बातमी, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल राष्ट्रवादीकडून थोड्याच वेळात घोषणा

मोठी बातमी, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल राष्ट्रवादीकडून थोड्याच वेळात घोषणा

राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल घोषणा करणार आहे. एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीत प्रवेश ही फक्त औपचारिकता बाकी आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थोड्याच वेळात घोषणा करणार आहे.  जयंत पाटील यांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसे  राजीनामा देणार आहे. पुढील 23 तारखेला मुंबईत खडसेंचा प्रवेश होणार असं सांगण्यात आले आहे. दरम्यान, न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना  एकनाथ खडसे यांनी सर्व चर्चांना विराम देत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. आज भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे हे  कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. 23 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता आहे.  खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या