Home /News /mumbai /

अमित शहांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, घडामोडींना वेग

अमित शहांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, घडामोडींना वेग

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis along with other BJP legislators arrives to attend a meeting on the Maratha reservation issue,  at the party office in Mumbai on Thursday, August 2, 2018. (PTI Photo/Shashank Parade) (PTI8_2_2018_000146B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis along with other BJP legislators arrives to attend a meeting on the Maratha reservation issue, at the party office in Mumbai on Thursday, August 2, 2018. (PTI Photo/Shashank Parade) (PTI8_2_2018_000146B)

फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

मुंबई, 17 जुलै : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घालणार आहेत. तसंच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. या नेत्यांसह साखर प्रश्नाच्या मुद्यावर फडणवीस केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. असं असलं तरीही फडणवीस यांच्या या दौ-याच्या निमित्ताने काही इतर मुद्यांचीही चर्चा होते आहे. राजस्थानात काँग्रेसचं सरकार अस्थिर आहे आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. अशा प्रकारचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही केला जात असतो. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. फडणवीसांची नियुक्ती होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्यातील कोरोनाग्रस्त भागांचाही दौरा केला होता. त्याबद्दलची चर्चाही या दौऱ्यादरम्यान केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकतंच पक्षाचे नेते आशिष शेलार यांनीही दोन दिवसीय दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचीही भेट घेतली होती. तसंच इतरही नेत्यांची भेट घेतली होती. याशिवाय फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाल्याने, तसंच सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंतकुमार यांचं निधन झाल्यामुळे पक्षाच्या संसदीय समितीत चार जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात एका जागी फडणवीस यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amit Shah, Devendra Fadnavis

पुढील बातम्या