'...म्हणून मी अभ्यास करण्यास तयार', शरद पवारांच्या टोलेबाजीवर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

'...म्हणून मी अभ्यास करण्यास तयार', शरद पवारांच्या टोलेबाजीवर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथील युवा संवाद कार्यक्रमात बोलताना चौफेर फटकेबाजी केली.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : 'देशाचे भवितव्य घडवण्याची ताकद या युवा पिढीत आहे. त्यांची कुवत व ताकद लक्षात घ्यायला हवी. मात्र आत्ताच्या पिढीबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत. परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथील युवा संवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

याच कार्यक्रमात एका विद्यार्थीनीने वेगळा प्रश्न विचारला. त्यात तिने भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तुमच्यावर पीएचडी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर तुमचं मत काय? असं विचारला असता पीएचडी पोस्ट ग्रॅज्युएटनंतर तीन वर्षाने करता येते मात्र चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करायला दहा ते बारा वर्षे लागतील, असा टोला शरद पवार यांनी लगावताच सभागृहात एकच हशा पिकला.

चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर

शरद पवार यांना 5 ते 7 खासदार निवडून आण आले नाहीत. मात्र तरीही ते देशाच्या राजकारणाच्या मध्यवर्ती आहे. एकाच वेळी राज ठाकरेंना हवं ते करायला लावणे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना हवं ते करायला लावणे. त्याचप्रमाणे सोनिया गांधीना देखील हवं ते करायला लावणे. मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार आहे,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 'संवाद साहेबांशी... सजग तरुणाईशी... नव्या स्वराज्याच्या उभारणीसाठी...' हा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या मुंबई विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वडाळा येथे आज पार पडला. 'साचेबंद अभ्यास करणं यातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे. त्यातून गुणात्मक बदल होत नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल केले पाहिजे. आव्हानाला तोंड देणारे अभ्यासक्रम तयार व्हावेत,' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवारांची चौफेर फटकेबाजी

'लोकशाही आहे, सर्वांना बोलण्याचा, निवडून येण्याचा अधिकार आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मात्र चुकीचे प्रतिनिधी सध्या येताना दिसत आहेत. आज हे मोठ्या प्रमाणात घडतंय. याला आवर घालायचा असल्यास जनतेने जागृत राहून अशा व्यक्तीला खड्यासारखे बाजूला करायला हवे, असेही शरद पवार म्हणाले.

महाविद्यालयीन प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी लोकशाहीनुसार महाविद्यालयाचा प्रतिनिधी निवडला जावा, त्यासाठी विद्यार्थ्यांमधून प्रतिनिधी निवडणूक घ्यावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी लॉ अभ्यासक्रमात सतत बदल व्हायला हवेत. जर बदल केले नाहीत तर तुम्ही आऊटडेटेड व्हाल. त्यामुळे आधुनिक अभ्यासक्रम घेण्याची खबरदारी घेण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. सीईटीबाबत बोलताना विद्यार्थ्यांचे वर्षे वाया जावू नये. ८ महिने जरी वाया गेले तरी त्यांचे भवितव्य धोक्यात येते त्यामुळे 40 ते 45 दिवसांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नये यासाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 09:00 PM IST

ताज्या बातम्या