उपमुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं हे उत्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं हे उत्तर!

'पक्ष हा कोणाचा नसतो. संघटना जी जबाबदारी देते ती पार पाडावी लागते. पक्षाचं काम करणाऱ्या व्यक्तींना संधी दिली जाते. '

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 30 सप्टेंबर : युतीच्या चर्चेत उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला देण्याचं ठरलं अशी चर्चा असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर मोठा खुलासा केलाय. उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजुन काहीही ठरलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाने आदेश दिल्याने पुण्यातून निवडणुक लढविणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. युतीची चर्चा पूर्ण झाली असून लवकरच सगळा तपशील जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं. या आधी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी आणि नंतर उपमुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं होतं. आता चंद्रकांत पाटील यांच्या या खुलाश्याने उपमुख्यमंत्रीपद राहणार नाही असं स्पष्ट होतंय.

निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ठाकरेंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

चंद्रकांत पाटील हे  कोथरूडमधून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले. पक्ष हा कोणाचा नसतो. संघटना जी जबाबदारी देते ती पार पाडावी लागते. पक्षाचं काम करणाऱ्या व्यक्तींना संधी दिली जाते. मात्र मला पक्षाने  सांगितल्यामुळे कोथरुड मतदार संघातून निवडणूक लढवावी लागत आहे.

तर नाराजीच्या वृत्तावर मेधा कुलकर्णी म्हणाल्या, लोकसभेपेक्षा विधानसभेला कोथरुड मतदार संघातून जास्तीत जास्त मताधिक्यांनी दादांना निवडून आणू. दादांना उमेदवारी मिळणं हे मला सर्टिफिकेट दिलं जातय की माझ्या मतदार संघात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष उभे राहत आहेत.

'अजित दादा कधी रागवतात तर, कधी हुंदका काढतात, हे सगळं नाटक'

आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक दशकं रिमोट कंट्रोल हाती ठेवणाऱ्या ठाकऱ्या घराण्याची तिसरी पिढी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य ठाकरेंनी स्वत:च याची घोषणा केलीय. शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं आदित्य यांचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठीच अहिर यांना आपल्याकडे शिवसेनेनं वळवलं अशीही चर्चा आहे. शिवसेनेच्या इतिहासातला हा एक मोठा निर्णय ठरणार आहे.  निवडणुकीच्या राजकारणात मी उतरणार नाही असं बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मात्र आदित्य ठाकरे यांनी तो संकेत मोडून ते आता थेट विधिमंडळात प्रवेश करणार आहेत.

First published: September 30, 2019, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading