Home /News /mumbai /

संघाच्या पद्धतीवर बोलला तर सोडणार नाहीत, भाजप आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

संघाच्या पद्धतीवर बोलला तर सोडणार नाहीत, भाजप आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

'हे सरकार त्यांच्याच बोजाने पडणार आहे त्यांना आम्ही काय आव्हान देऊ. आधी सरकार चालवून दाखवा, शेतकऱ्यांना मदत करून दाखवा'

'हे सरकार त्यांच्याच बोजाने पडणार आहे त्यांना आम्ही काय आव्हान देऊ. आधी सरकार चालवून दाखवा, शेतकऱ्यांना मदत करून दाखवा'

'हे सरकार त्यांच्याच बोजाने पडणार आहे त्यांना आम्ही काय आव्हान देऊ. आधी सरकार चालवून दाखवा, शेतकऱ्यांना मदत करून दाखवा'

    मुंबई, 15 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray dasara speech 2021) यांनी दसरा मेळाव्यातून हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली आहे. पण, 'भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावण्याचा प्रयत्न केलात तर सोडणार नाहीत' असा इशाराच भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी उद्धव ठाकरेंना दिला. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर सडकून टीका केली आहे. 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले पाहिजे. पण आज षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांचा दशावतार सुरू होता, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मेळाव्याचा त्यांनी उल्लेख केला.  संघाचा मेळावा हा विचारांची श्रीमंती होती. पण संध्याकाळी शिवसेनेची झाली ती रात्रीची उसनवारी होती, वातानुकूलित उसनवारी होती, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. Flipkart वरून मागवले 'Nothing' पण मिळाले 'Nothing', का संतापला अभिनेता? 'उसनवारी मेळाव्याला दिशा नव्हती. भीती असल्यामुळे चिरकण्याची भाषा होती. भीती होती म्हणून चिरकण्याची भाषा होती. आज धम्म परिवर्तन दिनी डॉ.बसबसाहेब अंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जी भाषा तुकडे गॅंगची आहे तीच भाषा उद्धव ठाकरे यांच्या भाषणात झळकतेय. तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य काँग्रेसकडे चालले आहेत, असं टोलाही शेलार यांनी लगावला. 'भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावण्याचा प्रयत्न केलात तर सोडणार नाहीत. देशाची एकता अखंडता तोडण्याचे काम केले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री ही तुकडे तुकडे गॅंग  प्रमाणे बोलत आहेत देशाच्या हिंदुत्वासाठी उपरी चालतील पण टपोरी चालणार नाहीत', असा टोलाही शेलार यांनी लगावला. बापरे! मराठी अभिनेत्रीची अवस्था झाली भयंकर; म्हणाली, 'माझ्यासाठी प्रार्थना करा' '2019 नंतरचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे. ज्यांची कातडी भगवी आहे, त्यांना शालीचा रंग बद्दलणाऱ्यांनी सांगू नये. हे सरकार त्यांच्याच बोजाने पडणार आहे त्यांना आम्ही काय आव्हान देऊ. आधी सरकार चालवून दाखवा, शेतकऱ्यांना मदत करून दाखवा, विद्यार्थ्यांना मदत करून दाखवा, जोड शब्द करण्याचे प्रयत्न, कोट्या शब्दांची भाषा करू नये, असा टोलाही शेलार यांनी लगावला. 'सत्तेसाठी स्वतःचे पद गेले तरी चालेल ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे. सत्याची भूमिका फडणवीसांची आहे. मुख्यमंत्रिपद असत्य सांगून घेतले की नाही हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असा सवालही शेलार यांनी केला. 'सावरकरांची बदनामी करणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसला आहेत. सावरकर यांना समलैंगिक म्हणणाऱ्या यांना ही उत्तर देऊ शकले नाहीत. पण सत्तेसाठी अनैतिक संबंध जोडले. या मेळाव्याचा पांडू कोण होता हे ठरवावे लागेल, असा टोलाही शेलार यांनी लगावला. टमी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात मी राज ठाकरे यांना बोलवावे असे सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम असल्याने प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार समाजासमोर पोहचवावे यासाठी त्यांचे नातू राज ठाकरे यांना निमंत्रित करावे असे मी म्हटलं आहे, राजशिष्टाचाराने राज ठाकरे यांना बोलवावे, अशी मागणीही शेलार यांनी पुन्हा एकदा केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ashish shelar

    पुढील बातम्या