Home /News /mumbai /

"भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल"

"भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल"

Ashish Shelar vs Sanjay Raut: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या भुताटकीच्या वक्तव्यावरून आशिष शेलार यांनी त्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

मुंबई, 25 मे: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची अद्याप निवड निश्चित झालेली नाहीये. त्याच दरम्यान राजभवात या आमदारांची यादीच नसल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामाना (Saamana)तून राज्यपालांवर टीका करण्यात आली. तसेच राजभवनात (Raj Bhavan) भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल असंही म्हटलं होतं. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलाच टोला लगावला आहे. ... तर तुम्हाला खूप भारी पडेल आशिष शेलार म्हणाले, "भूत आणि भुताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं 12-12 ची टिमकी वाजवली जात आहे. तुमचे कार्य 12 वाजलेत का? भुतानं जर फाइल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही आज करत नाहीये. पण भाजपने जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावं." 12 आमदारांची फाईल भुतांनी पळवली का? सेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल कोरोना काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही निवडणकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार धरता. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना 12 आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे. यांना राजकारणाचा महारोग जडला आहे अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे. आमदारांची यादी सापडली राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नसल्याचा दावा माहिती अधिकार अंतर्गत मागवण्यात आलेल्या अर्जावर करण्यात आल्यावर आता शिवसेने त्यावर टीका केली. यावर आता राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे. राजभवनाकडे विधान परिषदेच्या या 12 सदस्यांची यादी असल्याचा दावा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ashish shelar, Sanjay raut, Shiv sena

पुढील बातम्या