हेही वाचा.. पुण्यात मजुरांची फसवणूक, अधिकाऱ्यानं कोऱ्या कागदावर घेतल्या स्वाक्षरी आणि अंगठे मुख्यमंत्री परीक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परीक्षा घ्या, म्हणून राज्यपालांना जाऊन भेटतात. बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परीक्षा घ्यावीच लागेल तर कुलपती म्हणून राज्यपालांना याबाबत काहीच अवगत केले जात नाही, असंही आषिश शेलार यांनी म्हटलं आहे. पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल 40 टक्के म्हणजे ATKT असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी नापास करण्याचे हे षडयंत्र? तरुणांची एक पिढी उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र? उच्च शिक्षणमंत्री म्हणतात योग्य वेळी निर्णय घेऊ?, असं सांगून राज्य सरकार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे.कोरोनामुळे भयभीत विद्यार्थी, पालकांचा धोक्यात आलेला नोकरी-धंदा..त्यात सरकारचा “गोंधळात गोंधळ”..दुर्दैवाने विद्यार्थी तणावात.. आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी "सरकारचे संकटमोचन" मा. @rautsanjay61 तुम्हीच धावून या! चला तरुणांचे भविष्य वाचवू या! अन्यथा संघर्ष करावाच लागेल!(4/4)
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 12, 2020
कोरोनामुळे आधीच विद्यार्थी आणि पालक भयभीत आहेत. त्यात पालकांची नोकरी-धंदा धोक्यात आला आहे. त्यात सरकारचा गोंधळात गोंधळ सुरू असून दुर्दैवाने विद्यार्थी तणावात असल्याचं आशिष शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.मा. मुख्यमंत्री म्हणतात, परिक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचे पण शाळा कशा व कधी सुरु होणार? माहित नाही. मा. मुख्यमंत्री जाहीर करतात, अंतिम वर्षे पदवी परिक्षा रद्द, पण अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे विद्यापीठांत परिक्षांची तयारी सुरु! शिक्षणाचा महाराष्ट्रात असा “गोंधळात गोंधळ”!(1/4)
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 12, 2020
हेही वाचा... काका राज ठाकरेंच्या पावलावर आदित्य यांचे पाऊल, शिवसैनिकांना लिहिले पत्र आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी 'सरकारचे संकटमोचन' खासदार संजय राऊत तुम्हीच धावून या! चला तरुणांचे भविष्य वाचवू या! अन्यथा संघर्ष करावाच लागेल, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. संकलन, संपादन- संदीप पारोळेकरमा.मुख्यमंत्री परिक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परिक्षा घ्या म्हणून मा.राज्यपालांना जाऊन भेटतात...बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परिक्षा घ्यावीच लागेल. कुलपती म्हणून मा.राज्यपालांना काहीच अवगत केले जात नाही.महाराष्ट्रात शिक्षणाचा असा “गोंधळात गोंधळ”!(2/4)
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 12, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, BJP, Udhav thackeray