मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

IFSC वरून पुन्हा रणकंदन, शरद पवारांनी PM मोदींना पत्र लिहिल्यानंतर भाजप नेत्याने दिलं उत्तर

IFSC वरून पुन्हा रणकंदन, शरद पवारांनी PM मोदींना पत्र लिहिल्यानंतर भाजप नेत्याने दिलं उत्तर

भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई, 3 मे : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांचं (IFSC) मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवल्यामुळे भाजप आणि मोदी सरकारवर चहुबाजूने टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता या विषयावरून राजकीय रणकंदन सुरू झाले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. 'आज गळे काढणार्‍यांनी 2007 ते 2014 दरम्यान काय केले? आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे. तसा प्रस्ताव आम्हीच दिला होता. आता तुम्ही महाराष्ट्राचे सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, केंद्राला सांगा...केंद्राकडे मागा, त्यासाठीची प्रक्रिया पtर्ण करा..आम्ही सोबत आहोत. आयएफएससी स्थापन करण्यासाठी उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये मुंबईत हे केंद्र स्थापनेबाबत एक अहवाल केंद्र सरकारला सादर केला. 2014 पर्यंत तेव्हा महाराष्ट्राच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी ना प्रस्ताव सादर केला ना केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याचा विचार केला,' असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. 'बुलेट ट्रेनचे स्टेशन बीकेसी येथे प्रस्तावित करताना केंद्र सरकारने बीकेसी येथे आयएफएससीचा विचार केला. आयएफएससीची इमारत नियोजित करूनच स्थानकाची अट घातली...आता सांगा बुलेट ट्रेनला विरोध कोणी केला? राज्यात कोणताही प्रकल्प येणार म्हटल्यावर विरोधाच्या "फुगड्या" कोण घालतो? काहीजण काँग्रेसच्या तालावर आज टिपऱ्या खेळत आहेत..आता आयएफएससी वरुन बेंबीच्या देटापासून जे ओरडत आहेत, शंख करीत आहेत.. कोल्हे कुई करीत आहेत...त्यांची अवस्था तर "आपण हसायचं दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला" अशी झाली आहे,' असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही केला होता पलटवार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांचं (IFSC) मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवल्यानंतर भाजप आणि मोदी सरकारला कोंडीत पकडण्यात आलं होतं. या आरोपांना भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते,' असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 'आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिले. त्या संधीचा गुजरातने त्यावेळी फायदा घेतला,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Ashish shelar, Sharad pawar

पुढील बातम्या