मुंबई, 16 नोव्हेंबर : स्थानिक निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ' संजय हा सर्वव्यापी आहे. आमचे चुकले असेल तर सुधारू, हा प्रस्ताव नाही हे मनोगत आहे' असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केलं आहे. तर, 'एका चिडीतून हे सरकार निर्माण झालंय. त्यात आग ओतण्याचे काम करू नका' असं म्हणत संजय राऊत (sanjay raut) यांनी शेलार यांचा प्रस्ताव निकाली काढला.
TV पत्रकारांचा "न्यूज रूम लाईव्ह" या दिवाळी अंकाचे प्रकाशन शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी दोन्ही नेत्यांची चांगलीच जुगलबंदी पाहण्यास मिळाली.
पत्रकारांना नोबेल मिळाला आहे. (यावर राऊत बोलले की नो बेल) राज्य सरकारने पत्रकारांसाठी नो-बेल मिळण्यासारखे वागू नये. राऊतांकडे बघून वाटते. कभी कभी मुझे लगता है की इस आदमी का क्या करे. तुम्ही तीनचाकी गाडी बनवली पण चालक नाहीये तुम्ही. राऊत साहेब तुम्ही लई भारी माणूस आहात. तीन पक्षांचे तुम्ही सरकार बनवले हे स्वप्नातही वाटले नाही. तुम्ही केलेले आहे, असं आशिष शेलार म्हणाले.
येत्या 5 दिवसात कोकण-मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस; पुण्यासह मुंबईतही हाय अलर्ट
'आता काय करायला हवे. चेहऱ्यावरचा मास्क काढा. उद्धव ठाकरे व शरद पवार आदरणीय पण तिसरे जे घुसलंय ते मान्य नाही. भगवा बॉम्ब फुटू द्या. संजय हा सर्वव्यापी आहे. आमचे चुकले असेल तर सुधारू प्रस्ताव नाही हे मनोगत आहे. निधड्या छातीचा हा मित्र आहे. मतमतांतर आहेतच, असंही शेलार म्हणाले.
तर, एका चिडीतून हे सरकार निर्माण झालंय. त्यात आग ओतण्याचे काम करू नका. पुन्हा आग भडकेल, असं म्हणत संजय राऊत यांनी आशिष शेलार यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.
lose weight Tips: पोटाची चरबी गायब करेल फक्त 1 लिंबू; आहारात असा करा समावेश
'राहुल गांधी सावरकरांवर टीका करतात. पण आम्ही त्याला उत्तर देतो, काँग्रेसवर जाहीर टीका माझ्या इतकी कुणीच केली नाही. पण देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचे महत्व आहे. हे विसरता येणार नाही. राजकारण हे राजकारणाच्या जागी हवे' असंही राऊत म्हणाले.
आशिषजी आपण पुढे जायला हवेत राजकारणात. देशाचे नेतृत्व कुठल्याही मराठी माणसानं करायला हवं.देवेंद्र फडणवीस यांनी चांगली टीका केली माझ्यावर. टीका म्हणजे पोचपावती असते. प्रत्येकजण आपली स्पेप घेतो. संजय राऊत आपल्या ठिकाणी आहेत, पत्रकार हा राजकारणीच असतोस असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar