हे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का? भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर ऐकेरी भाषेत टीका

हे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का? भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर ऐकेरी भाषेत टीका

' मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही.'

  • Share this:

मुंबई 03 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शेलक्या भाषेत टीका केल्याने वाद निर्माण झालाय. वसई इथं रविवारी झालेल्या सभेत त्यांनी ही टीका केली. CAA आणि NRC राज्यात लागू होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर टीका करताना शेलार यांनी हे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का? अशी टीका केली होती. राज्यात कायद्याचं राज्य चालतं आणि राज्य हे घटनेनुसार चालतं त्यामुळे संसदेने मंजूर केलेला कायदा कसा लागू करणार नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं असंही शेलार यांनी म्हटलंय.

हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी केलाय.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा या विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

शेलार यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केलीय अशी टीका करणं हे तुम्हाला शोभत नाही. मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही असंही त्यांनी म्हटलंय.

आज सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपण कुठून निवडणूक लढविणार आहोत त्याचा खुलासा केलाय.

परिषद की सभा?

तुम्हाला सांगू का! मुळात मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन. ताबडतोबीने आता मला वाटतं विधान परिषदा येतील.

विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घेऊन. विधान परिषदेपेक्षा माझे मत असे आहे की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे.

First published: February 3, 2020, 11:09 AM IST

ताज्या बातम्या