या राज्यात हिंदू आणि महिलांना अपमानास्पद वागवणार का? भाजप नेत्याचा CM ठाकरेंना सवाल

या राज्यात हिंदू आणि महिलांना अपमानास्पद वागवणार का? भाजप नेत्याचा CM ठाकरेंना सवाल

  • Share this:

मुंबई 24 डिसेंबर : महाराष्ट्रातल्या सत्ता प्रयोगानंतर भाजप आणि शिवसेनेमधली दरी आणखी वाढलीय. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे हल्लाबोल वाढलाय. या आरोपात आता अमृता फडणवीसही उतरल्या असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल केलाय. त्यामुळे त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला जोड्यांनी मारत आंदोलन केलं. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिणाऱ्या व्यक्तिला मारहाण कर शिवसैनिकांनी त्याचं मुंडन केलं. यावर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट सवाल केलाय. ते म्हणाले, सरकार विरोधी बोलणाऱ्याचे अमानुष मुंडन करून बेदम मारहाण केली. सरकार विरोधी महिला बोलली तर त्यांना अपमानित करण्यात आले. मा. पवार साहेब आता तुम्हाला ही "असहिष्णुता" वाटत नाही का? मा. मुख्यमंत्री, या राज्यात हिंदू सुरक्षित आहे का? हिंदू आणि महिलांना आता असेच अपमानास्पद वागवणार का? असा सवाल शेलार यांना ट्विटरवरून केलाय. त्यामुळे हे राजकीय युद्ध आणखी रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटला शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी रिट्वीट करत चोख उत्तर दिलं आहे. ''माजी' झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही. त्यामुळे बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार' अशी जहरी टीका अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुंडन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ट्विटरवरून समज दिलीय. असे उद्योग करण्यापेक्षा चांगलं काम करून त्यांना उत्तर द्या अशी समज त्यांनी शिवसैनिकांना दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 10:23 PM IST

ताज्या बातम्या