S M L

Breaking: भाजप नेत्याला खंडणी मागितल्या प्रकरणी ठाण्यातून अटक

माजी नगरसेवक आणि सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाईने ही कारवाई केली आहे.

Updated On: Oct 27, 2018 01:59 PM IST

Breaking: भाजप नेत्याला खंडणी मागितल्या प्रकरणी  ठाण्यातून अटक

ठाणे, 27 ऑगस्ट : माजी नगरसेवक आणि सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाईने ही कारवाई केली आहे.

सुप्रसिध्द हिरानंदानी बिल्डर यांच्याकडे खंडणीसाठी बर्गे यांनी तगादा लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. २००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते. तर गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

दरम्यान, याच महिन्यात काही दिवसांआधी पुण्यात आणखी एका भाजप आमदाराला खंडणी घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पुण्यातल्या हडपसरचे भाजप आमदार आणि भाजप युवा मोर्च्याचे राज्याचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाख रुपये खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.योगेश टिळेकर आणि त्यांचा भाऊ चेतन टिळेकर यांनी कोंढवा परिसरात ऑप्टिक फायबरचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला वारंवार फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केली. 'इ-व्हिजन टेलिइन्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड' असे या कंपनीचे नाव होतं.

कंपनीचे दक्षिण पुणे विभागाचे अधिकारी रवींद्र बराटे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली होती. 7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचे बराटे यांनी तक्रारीत म्हटलं होतं.

तर योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची आज बदली करण्यात आली होती. पोलीस दलात बदली होणे हे नेहमीचं आलं. मात्र, ज्या अधिकाऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून गुन्ह्याचा चढा लावला त्या अधिकाऱ्याला सोडून जाताना खाकीतील माणसाला अश्रू अनावर झाले. मिलिंद गायकवाड यांच्या बदलीमुळे सर्व पोलीस कर्मचारी भावूक झाले होते.

Loading...
Loading...

 

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 01:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close