मुंबई, 14 डिसेंबर: शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिन्स किंवा टी-शर्ट वापरण्यात बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारनं मार्गदर्शिका लागू केली आहे. मात्र, यावरून भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पोशाखाबाबत राज्य शासनानं नुकताच घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. मात्र, शासकीय यंत्रणांचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांना सुद्धा हा निर्णय बंधनकारक असावा. राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी खासगी पर्यटनाच्या 'दिशेला' जाताना जीन्स घालावी, सरकारी कामकाजात नव्हे, अशा शब्दांत आचार्य तुषार भोसले यांनी लगावला आहे.
हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांचा बंगलाही डिफॉल्टरच्या यादीत
मंत्रालयात काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि कंत्राट कर्मचाऱ्यांना पोषाखाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या नव्या सूचनेनुसार मंत्रालयात आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसंच मंत्रालयात स्लीपर्स वापरू नये, असंही नव्या नियमांत म्हटलं आहे.
महिलांनी साडी, सलवार चुडीदार, पॅन्ट, ट्राउझर आवश्यकता असल्यास दुपट्टा घालवा. तर पुरुषांनी शर्ट पॅन्ट, ट्राउझर घालावे, असं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद करण्यात आलं आहे.
आणखी काय आहेत पोषाखाबाबत सूचना?
- गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये
- आठवड्यातील एक दिवस शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावे
- जीन्स आणि टी शर्ट घालू नये.
अध्यादेश लागू ...
सर्व शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात घालण्यात येणाऱ्या कपड्याला देखीव आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. यापुढे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्टला बंदी घालण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारनं 8 डिसेंबरला अध्यादेश जारी केला आहे.
हेही वाचा...भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, तरुण-तरुणी ठार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिलांच्या पोषाखाबाबत शिर्डीतील साई संस्थानकडूनही नवी नियमावली जारी करण्यात आली होती. साई संस्थानच्या या निर्णयानंतर मोठं वादंगही निर्माण झालं होतं. हा वाद ताजा असतानाच आता मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पोषाखावरून शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे.