S M L

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नमो युवा रोजगार केंद्राचं उद्घाटन

शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मुंबईकरांना रास्त दरात उपलब्ध करुन देणाऱ्या आणि नोकरदार, विद्यार्थी वर्गाला घरपोच डब्बा मिळवणाऱ्या दोन उपक्रमाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

Sachin Salve | Updated On: Aug 14, 2017 08:09 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नमो युवा रोजगार केंद्राचं उद्घाटन

14 आॅगस्ट : शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मुंबईकरांना रास्त दरात उपलब्ध करुन देणाऱ्या आणि नोकरदार, विद्यार्थी वर्गाला घरपोच डब्बा मिळवणाऱ्या अशा नमो युवा रोजगार केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. 'आईचा डब्बा' असं या उपक्रमाला नाव देण्यात आलंय.

शेतकऱ्यांचा भाजीपाला बचत गटाच्या माध्यमातून जमा करायचा, आणि मुंबईत रास्त किमतीत तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा असा हा उपक्रम आहे. तर मुंबईकरांना सकस आणि घरचं जेवण मिळावं यासाठी आईचा डबा हा उपक्रमही आज सुरू करण्यात आला. तर शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत या उपक्रमाअंतर्गत सरकार बेरोजगार तरुणांना भाजी विक्रीसाठी गाड्या उपलब्ध करुन देणार आहे. मुंबईत 125 गाडयांचा हा उपक्रम असेल. त्यापैकी प्रायोगिक तत्वावर 10 गाड्या आज सुरू करण्यात आल्या.

महिला बचत गटांनी बनवलेलं जेवण मुंबईतल्या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जाऊन या गाड्यांद्वारे पुरवलं जाईल. शेतमालाच्या भावाची योग्य किंमत समजावी, तसंच शेतकऱ्याला माल विकण्यासाठी विक्रीच्या गाडीची माहिती मिळावी यासाठी एक मोबईल अॅपही बनवण्यात येणार आहे अशी माहिती


मी मुंबई अभियान-अभिमानचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली.

नमो युवा रोजगार केंद्राअंतर्गत आईचा डबा हा उपक्रम आज सुरू करण्यात आला. मुंबईकरांना सकस आणि घरचं जेवण मिळावं तसंच मुंबईतल्या बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या उपक्रमाला स्पर्धा नाही. कुणाच्याही वड्याला आमचा डबा पर्याय नाही. ज्याला असं वाटत असेल त्यानं वाटून द्यावं असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 08:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close