Home /News /mumbai /

भाजपची नवी मोहीम; Missed call देण्यासाठी का शेअर केलाय हा नंबर?

भाजपची नवी मोहीम; Missed call देण्यासाठी का शेअर केलाय हा नंबर?

New Delhi: Prime Minister Narendra Modi arrives to address his supporters after the party's victory in both Haryana and Maharashtra Assembly polls, at BJP HQ, in New Delhi, Thursday, Oct 24, 2019. (PTI Photo/Atul Yadav)(PTI10_24_2019_000300B)

New Delhi: Prime Minister Narendra Modi arrives to address his supporters after the party's victory in both Haryana and Maharashtra Assembly polls, at BJP HQ, in New Delhi, Thursday, Oct 24, 2019. (PTI Photo/Atul Yadav)(PTI10_24_2019_000300B)

CAAच्या समर्थनासाठी भाजपने आता जोरदार मोहीम उघडली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी पुढाकार घेत आहेत.

    विवेक कुलकर्णी, मुंबई 02 जानेवारी : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला होणारा विरोध लक्षात घेऊन भाजपही आता आक्रमक झालाय. CAAच्या समर्थनासाठी भाजपने आता जोरदार मोहीम उघडली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी ट्विटरवर #IndiaSupportsCAA ही मोहीमही चालवली होती. त्यासाठी काही मान्यवरांचे व्हिडीओही त्यांनी ट्विट केले होते. CAAला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी देशभर प्रचंड विरोध केलाय. त्यासाठी मोर्चे आणि निदर्शनही केली आहेत. हा वाढता विरोध लक्षात घेऊन त्याची धार कमी करण्यासाठी आता भाजपनेही पुढाकार घेतला असून आता मिस्ड कॉल देऊन नागरिकता सुधारणा कायद्याच्या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी भाजपनं मोहीम सुरु केलीय. नागरिकता सुधारणा कायद्याला देशभरात होणारा विरोध लक्षात घेता भाजपनंही या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांची मोहीम सुरु केलीय. त्यासाठी 8866288662 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपला पाठिंबा जाहीर करता येणार आहे. तसं आवाहनच पक्षातर्फे करण्यात आलंय. यापूर्वी भाजपनं आपल्या पक्ष समस्यांची नोंदणी करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला होता. आता पुन्हा एकदा नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निमित्ताने भाजप या पद्धतीचा वापर करताना पुन्हा एकदा दिसतंय. महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीच्या परेडमध्ये केंद्राने परवानगी नाकारली आज कर्नाटकमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रदानांनी काँग्रेससहीत विरोधीपक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय. कर्नाटकातल्या तुमकूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार कोरडे ओढले. पंतप्रधान म्हणाले, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाच्या विरुद्ध काँग्रेस देशभर मोर्चे काढत आहे. CAA, कलम 370 आणि अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं. पंतप्रधान म्हणाले, आम्हाला वारशात अनेक समस्या मिळाल्या आहेत. त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करत आहे. असं असेल ठाकरे सरकारचं संभाव्य खातेवाटप, मंत्री आणि त्यांची खाती जाणून घ्या पंतप्रधान पुढे म्हणाले, पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदुंचा धार्मिक आधारावरून छळ होतोय. त्यामुळे आपली जीव वाचविण्यासाठी सगळे हिंदू भारतात शरण घेण्यासाठी आले आहेत. त्यांना मदत करण्याचं सोडून त्यांच्याविरूद्ध मोर्चे काढले जात आहेत. या लोकांवर पाकिस्तानने अत्याचार केले मात्र त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढणाऱ्यांची तोंड या अत्याचाराविरुद्ध बंद आहेत. खरं तर त्यांनी पाकिस्तानचे कारनामे जगासमोर उघड करायला पाहिजे होते. मात्र तसे न करता ते व्होट बँकेचं राजकारण करत आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या