Home /News /mumbai /

BJP Kisan Morcha Mumbai: "भाजपचा मोर्चा येणार म्हणून सरकार विधानसभा तहकूब करुन पळून गेले" - देवेंद्र फडणवीस

BJP Kisan Morcha Mumbai: "भाजपचा मोर्चा येणार म्हणून सरकार विधानसभा तहकूब करुन पळून गेले" - देवेंद्र फडणवीस

"भाजपचा मोर्चा येणार म्हणून सरकार विधानसभा तहकूब करुन पळून गेले" - देवेंद्र फडणवीस

"भाजपचा मोर्चा येणार म्हणून सरकार विधानसभा तहकूब करुन पळून गेले" - देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आज भाजपच्या वतीने मुंबईत किसान मोर्चा काढण्यात आला. विधानभवनावर हा मोर्चा काढण्यात येणार होता मात्र, भाजप कार्यालयातून विधानभवनाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला.

मुंबई, 4 मार्च : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget session) सुरू झालं असून अधिवेशनात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच दरम्यान आज भाजपच्या वतीने किसान मोर्चाचं (BJP Kisan Morcha) आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. भाजप कार्यालय ते विधानभवन असा हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं भाजपने आधीच सांगितलं होतं. त्यानुसार आज हा मोर्चा काढला. या मोर्चात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तुमच्या दहशतीमुळे विधानसभा तहकूब करुन गेले देवेंद्र फडणवीस म्हणाले, किसान मोर्चाच्या माध्यमातून आपण सर्वजण शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेवर धडकलात. तुमची दहशत किती आहे बघा... तुम्ही विधानसभेवर येण्यापूर्वीच विधानसभा तहकूब करुन दोन दिवसांकरता सरकार पळून गेलं. या सरकारचं नाव 'महावसुली सरकार' ठेवायला हवं आम्हाला चर्चेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडायच्या होत्या. पण सरकारच्या हे लक्षात आलं की, यातल्या कुठल्याच गोष्टीवर आपण उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून थेट सोमवारपर्यंत विधानसभा तहकूब करुन ही सर्व मंडळी निघून गेली. एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला संघर्ष करवाच लागेल. तुम्ही रस्त्यावर संघर्ष करता. हा संघर्ष सभागृहात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लावून धरणार आहोत. अशा प्रकारचं सरकारी सरकार या महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही. इतक्या सावकारी पद्धतीने वसुली.... खऱ्या अर्थाने या सरकारचं नाव महाविकास आघाडी सरकार ऐवजी महावसुली सरकार ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने वसुली यांनी शेतकऱ्यांकडून यांनी सुरू केली आहे. वाचा : वीज तोडणीचा पहिला बळी; "शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा येणार नाही" म्हणत VIDEO शूट करुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही पाच वर्षात कधीही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. बिल भरण्याला सक्ती केली नाही. ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यास बिल भरले नसतानाही ट्रान्सफॉर्मर बदलून द्यायचो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मंत्र्यांच्या घराचे बिल सरकार भरते तर एखाद्या वर्षी शेतकऱ्यांने बिल भरले नाही तर काय होईल. धन दांडग्यांना हात लावणार नाहीत, पण शेतकऱ्यांना त्रास देणार. मुंबईच्या मंत्रालयात सुलतानी लोक बसले आहेत. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मागच्याच्या मागच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी वीज कनेक्शन कापू नये म्हणून आपण गदारोळ घातला. लगेच उपमुख्यमंत्री उठले आणि घोषणा केली की, वीज कनेक्शन कापण्याला मी स्थगिती देतो. आपल्याला वाटलं वा... राजा उदार झाला. पण ज्या दिवशी अधिवेशन संपलं त्यादिवशी ऊर्जामंत्र्यांनी येऊन घोषणा केली की, आम्ही स्थगिती हटवली आहे आणि आजपासून आम्ही वीज तोडणी सुरू करणार.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Budget, Devendra Fadnavis, Farmer, Farmer protest

पुढील बातम्या