Home /News /mumbai /

मंदिरं ते मेट्रो, महाराष्ट्र द्वेषी म्हणत मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार पलटवार

मंदिरं ते मेट्रो, महाराष्ट्र द्वेषी म्हणत मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार पलटवार

'तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला कुणासोबत वाईटपणा घेण्याची वेळ आली तर ती मी घेण्यासाठी तयार आहे'

    मुंबई, 08 नोव्हेंबर :  'मंदिर (temple open issues)कधी उघडणार असं विचारलं जात आहे. दिवाळीनंतर एक नियामवली केली जाणार आहे. गर्दी टाळणे हाच एक नियम असणार आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला नाही', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. तसंच महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्र द्वेष्यांनी केले होते, पण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर (BJP) जोरदार पलटवार केला आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेल्या उद्योग-धंदे सुरू झाले आहे. पण, मंदिरं अजूनही बंद आहे. त्यामुळे मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून भाजपने राज्यभरात आंदोलन करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंदिरं का उघडली जात नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 'मंदिर कधी उघडणार असं विचारलं जात आहे. दिवाळीनंतर एक नियामवली केली जाणार आहे. गर्दी टाळणे हाच एक नियम असणार आहे. मंदिरांमध्ये घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिक जात असतात. त्यांना आतापर्यंत आपण जपत आलो आहोत. परंतु, ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडूच नये. मंदिर, मशीद, चर्चमध्ये आपण खेटून खेटून आरती प्रार्थना करत असतो. त्यामुळे जर मंदिरात एखादा कोरोनाबाधित व्यक्ती आला तर कोरोनाची लागण झाली तर ते जास्त महागात पडले. त्यामुळे जेव्हा नियमावली केली जाईल, तेव्हा मंदिरात मास्क घालणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. धक्कादायक! ऑन ड्युटी शिपायानं बार गर्लवर पैसे उडवत स्टेवर लगावले ठुमके 'माझ्यावर टीका होत आहे, पण मी पहिल्याच दिवशी सांगितले आहे. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला कुणासोबत वाईटपणा घेण्याची वेळ आली तर ती मी घेण्यासाठी तयार आहे. वाईट म्हणणारी चार दिवस बोलत असतात. पण उद्या काही निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले तेव्हा टीका करणारे कुणीही जबाबदारी घेण्यासाठी पुढे येणार नाही. उलट ती लोकं तुमचं तुम्ही बघा,  आम्ही तर बोललोच होतो, असं सांगून मोकळी होतील. म्हणून सावधपणे पाऊलं टाकत आहोत, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपला उत्तर दिले आहे. 'महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना, महाराष्ट्र द्वेष्टांनी  महाराष्ट्राला बदनाम करण्याचे जे कारस्थान केले होते. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कोलमडून पडली आहे, अमली पदार्थांची शेती होत आहे, अशी कारस्थान तोडून मोडून काढले आहे, असं टोलाही ठाकरेंनी लगावला. 'जूनमध्ये 17 हजार कोटींचे सामजस्य करार केले आहे. नुसते सामंजस्य करार केले नाही. तर काही उद्योजकांना राज्यात जागा दिल्या आहे, पुढेही दिल्या जातील आणि गुंतवणूक सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सुद्धा 35 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहे. अनेक देशाविदेशातील कंपन्या या महाराष्ट्रात येत आहे. लॉकडाउनमध्ये कडी कुलुपं लावून सर्वजण घरी बसले आहे. माझ्यावर टीका झाली की, मातोश्रीच्या बाहेर पडलो नाही. पण, मी घरी बसून सुद्धा ही कामं केली आहे, असं सणसणीत उत्तरही ठाकरेंनी भाजपला दिले आहे. राजकारणाची दिशा बदलणार! कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा सेनेचा इरादा 'मेट्रो कारशेड प्रकल्प हा कांजुरमार्गला हलवण्यात आला आहे. त्याच्यावरून टीका झाली. कुणी तरी म्हणाले की ही जागा मिठागराची आहे. पण, टीका करणाऱ्यांनी मुंबई करांच्या प्रकल्पात मिठाचा खडा टाकला आहे. आता मिठाचा जो खडा टाकला त्याचा इलाज केला जाईल. आम्ही काही डोळेबंद करून काही काम करत नाही. जे जे मुंबईकरांसाठी हिताचे काम आहे, ते टीका  करण्याऱ्यांची पर्वा न करता केले जाईलच, असंही त्यांनी ठामपणे सांगितले. 'मेट्रो कारशेडसाठी जर्मनीच्या केएफ डब्ल्यू कंपनीकडून 545 दक्षलक्ष युरो कर्ज घेण्यात आले आहे. हे कर्ज अत्यंत माफक दरात घेण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात फटाके बंदी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 'गेल्या सात महिन्यांपासून लढा देऊन परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांच्या धुरात हे वाहून जाता कामा नये, प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळा, शक्यतो फटाके फोडूच नये. फटाके फोडले नाही तर उत्तमच आहे. दिवाळीतील चार महिने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फटाकेवर बंदी आणली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेऊन फटाके फोडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. 'स्पॅनिश फ्लू आला होता. त्यावेळी अनेक वर्ष त्याने थैमान घातले होते. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे सतर्क राहावे लागणार आहे. जरी आपण सर्व गोष्टी उघडत आहोत. पण गती देत असताना अधोगती होऊ द्यायची नाही. जर पुन्हा  लॉकडाउन करण्याची वेळ आली तर ते अत्यंत महागात पडणारे आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या