मुंबई, 07 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर एका महिलेनं आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी सुनयना होलेविरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. पण, या महिलेला जामीन हा भाजपच्या नेत्यांची केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.
राज्यात भाजपला सत्तेवरुन खाली खेचल्यानंतर ठाकरे सरकाराला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचे नेते कोणतीही संधी सोडत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटो हा मौलवी म्हणून व्हायरल करण्यात आला होता. या पोस्टमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सुनयना होले या महिलेला अटक करण्यात आली होती. पण, या महिलेला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे. या जामिनामागे भाजपचा हात असल्याचं समोर आलं आहे.
Bailable offense registered, Bail Done
Spoken to concerned officials
Will ensure a fair investigation on the charges pressed! https://t.co/HCJysxxyay
— Devang Dave (@DevangVDave) August 6, 2020
दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते तजिंदर पाल बग्गा आणि भाजपचा आयटी सेलचा प्रमुख देवांग दवे यांनी जामिनासाठी या महिलेला मदत केली. खुद्द तजिंदर बाल बग्गा यांनी देवांग दवेला या प्रकरणाला लक्ष घालण्यास सांगितले होते. तर देवांग यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असल्याची माहिती दिली होती.
एवढंच नाहीतर ज्या दिवशी सुनयना होलेला जामीन मंजूर झाला होता, तेव्हा देवांगने ट्वीट करून याची माहिती जाहीर केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यामागे भाजपचा हात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अलीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही ठाकरे सरकारविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आहे. भाजपच्या नेत्यांनी उघडपणे ठाकरे कुटुंबावर बेछुट आरोप केले होते. एवढंच नाहीतर या भाजपच्या नेत्यांनी दिनो मोर्यापासून ते सूरज पांचोली यांची नाव समोर आणली होती. पण दोघांनीही आपला या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगून दावा हाणून पडला होता.