मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

काळ्या टोपीखालचा मेंदू सत्ता मिळवण्यासाठी ‘हिंदुत्व’ सोडत नाही, भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

काळ्या टोपीखालचा मेंदू सत्ता मिळवण्यासाठी ‘हिंदुत्व’ सोडत नाही, भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

'उद्धव ठाकरे यांचं भाषण हे गोंधळलेलं आणि गडबडलेलं होतं. त्यात ना धड हिंदुत्व, ना विकास ना धड सेक्युलॅरिझम असं काहीही नव्हतं.'

'उद्धव ठाकरे यांचं भाषण हे गोंधळलेलं आणि गडबडलेलं होतं. त्यात ना धड हिंदुत्व, ना विकास ना धड सेक्युलॅरिझम असं काहीही नव्हतं.'

'उद्धव ठाकरे यांचं भाषण हे गोंधळलेलं आणि गडबडलेलं होतं. त्यात ना धड हिंदुत्व, ना विकास ना धड सेक्युलॅरिझम असं काहीही नव्हतं.'

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 25 ऑक्टोबर: शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात भाजपवर जोरदार वार केले होते. त्यांच्या भाषणाचा सगळा रोख हा भाजपला टार्गेट करणारा होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. ठाकरे यांनी संघाच्या काळ्या टोपीवरून भाजपवर कोरडे ओढले होते. त्याला उत्तर देतांना भाजपने मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली. काळ्या टोपीखाली मेंदू असतोच पण तो स्वत:ला सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवत नसतो, हिंदुत्व सोडत नसतो अशी टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर म्हणाले, आजचं उद्धव ठाकरे यांचं भाषण हे गोंधळलेलं आणि गडबडलेलं होतं. त्यात ना धड हिंदुत्व, ना विकास ना धड सेक्युलॅरिझम असं काहीही नव्हतं. काँग्रेस नाराज होईल म्हणून सावकरांविषयी दोन चार वाक्य काढण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचाही भाषणात उल्लेख नाही अशी टाकाही त्यांनी केली. काय म्हणाले उद्धव ठाकरे? सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणाही त्यांनी भाजपला लगावला. BIG NEWS राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 14 लाख 60 हजारांवर आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या तो सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले. मुंबई, शिवाजी पार्क सगळीकडे चरस गांजा पिकला अस चित्र काही निर्माण केले, आमच्या घरासमोर तुळशीवृंदावन असते. गांजाची शेती तुमच्याकडे असते. मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते. पाकव्याप्त हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही. एकाने आत्महत्या केल्यानंतर बिहार पूत्र गेला म्हणून गळे काढले जात आहेत. गळे काढणारे महाराष्ट्र सरकार, ठाकरे कुटुंबीय, आदित्य यावर आरोप केले, गोमूत्र शेणाने गुळण्या केल्या नंतर काय झालं. बिहारला मोफत लस, उरलेला देश पाकिस्तान आहे की बांग्लादेश? - मुख्यमंत्री महाराष्ट्र द्वेष पसरवला जोतोय त्यामुळे सावध रहा. देश तोडण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपा हा मित्रपक्ष पण इमान नका राखू पण किमान मातीशी इमान राखा. अहंकारी राजा आणि कळसु्त्री बाहुल्यांचा खेळ येथे चालणार नाही. कोरोना संकट असताना केवळ पाडापाडी करून सरकार पाडण्याच काम होत असेल तर अराजक वाटचाल आहे. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. त्याची त्यांनी काळजी करू नये. पण त्यावरून राज्यात फुट पाडण्याचं राजकारण यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं.
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या