S M L

आता मुंबई महाविद्यालयांमध्ये मिळणार भगवदगीता

जिथे भाजपची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात असं काही झालं नव्हतं. पण आता इथंही सुरू झालं

Updated On: Jul 12, 2018 01:18 PM IST

आता मुंबई महाविद्यालयांमध्ये मिळणार भगवदगीता

मुंबई, 12 जुलैः आता राज्यातल्या नॅक ए आणि ए प्लस मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवदगीतेचा अभ्यासही करावा लागणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. परिपत्रकानुसार, मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील 100 महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्यात येणार आहे.

परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या ए आणि ए प्लस श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या 100 भगवदगीतेचे संच संबंधित महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यात आले आहे.

तसेच सरकारच्या निर्णयावर टीका करत कपिल पाटील म्हणाल की, 'जिथे भाजपची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात असं काही झालं नव्हतं. पण आता इथंही सुरू झालं आहे. या सगळ्यातून संघीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर धर्माचा प्रसारच करायचा असेल तर मग सगळ्याच धर्माचे ग्रंथ वाटायला हवे.'

सरकारच्या या निर्णयाचा आता विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. 'आमचा भगवतगीतेला विरोध नाही मात्र महाविद्यालयात ती आणू नये,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता असावी. त्यामुळे सरकारला या आदेशावर पुन्हा एकदा विचार करायला हवा, असं विद्यार्थी संघटनांचं मत आहे.

हेही वाचाः

Loading...
Loading...

आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

पाकने केला पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्याचा अपमान, पगडी हिसकावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close