भाजपची डिनर डिप्लोमसी ; एमआयएमला बोलावलं, सेनेला वगळलं

भाजपची डिनर डिप्लोमसी ; एमआयएमला बोलावलं, सेनेला वगळलं

या स्नेहभोजनाला शिवसेनेला वगळण्यात आलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आलं नाही

  • Share this:

05 एप्रिल : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. राज्याचे महसूलमंत्री यांनी सर्वपक्षीयांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. पण, या स्नेहभोजनाला एमआयएमला बोलवण्यात आलं पण शिवसेनेला वगळण्यात आलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आलं नाही.

या स्नेहभोजनला भाजपने अपक्ष, बहुजन विकास आघाडी, रासप,शेकाप, सपा, भारीप आणि माकपला बोलावलं. विशेष म्हणजे भाजपने मनसे आणि एमआयएमलाही निमंत्रण पाठवलं होतं. पण, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला वगळल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय.

विशेष म्हणजे अधिवेशनाच्या काळात शिवसेनेनं कर्जमाफीसाठी विरोधकांची भूमिका घेतली होती. त्यामुळेच बदला म्हणूनही काय स्नेहभोजनला सेनेला डावलण्यात आलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.

या पक्षाला स्नेहभोजनाला निमंत्रण

भाजपा 122

अपक्ष - 7,

बहुजन विकास आघाडी - 3,

रासप - 1

शेकाप 3

मनसे - 1

एमआयएम - 2

सपा - 1

भारीप - 1

माकप - 1

या पक्षाच्या आमदारांना आमंत्रण नाही

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

शिवसेना - 63

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 10:49 PM IST

ताज्या बातम्या