दिवाळीच्या दिवशी नवनीत राणांचे पती कारागृहात, फडणवीसांनी ठाकरे सरकारला सुनावले

दिवाळीच्या दिवशी नवनीत राणांचे पती कारागृहात, फडणवीसांनी ठाकरे सरकारला सुनावले

अटक केल्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास राणा यांच्यासह 20 शेतकऱ्यांना न्यायालयात हजर केले. मात्र आमदार रवी राणा यांनी न्यायालयात जामीन नाकारला.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत (Amravati) बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी रवी राणा यांच्या अटकेबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.'शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो' असं फडणवीस म्हणाले आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी  व लॉकडाउन काळात आलेली वीज माफ करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी  रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

रवी राणांनी जामीन नाकारला

अटक केल्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास राणा यांच्यासह 20  शेतकऱ्यांना न्यायालयात हजर केले. मात्र आमदार रवी राणा यांनी न्यायालयात जामीन नाकारला. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय सुरू ठेवण्यात आले.  या सर्व आंदोलनकर्त्यांची अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृहातच आता राणा आणि त्यांच्या सर्व आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Published by: sachin Salve
First published: November 14, 2020, 1:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या