देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा, उद्धव ठाकरेंना विचारला थेट सवाल

देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा, उद्धव ठाकरेंना विचारला थेट सवाल

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पत्र प्रसिद्ध केले आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जून : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या उपाययोजनेवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सामना रंगला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंबई पालिकेच्या कारभारावरून पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काही व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. ही टीम  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास दफनविधीसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला समन्वयाची जबाबदारी दिल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

ही संघटना देश विरोधी आणि समाज विरोधी कृत्यांसाठी ओळखली जाते, मग त्यांच्यावर ही जबाबदारी का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रकार मान्य आहे का? आणि जर हे मान्य नसल्यास या प्रकरणी कोणती कठोर कारवाई करणार असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला आहे.

हेही वाचा - बाप रे! आता केस कापण्यासाठी लागणार आधार कार्ड, 'या' राज्यानं दिले आदेश

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबद्दल अजून कोणताही खुलासा करण्यात आला नाही. परंतु, दोन प्रकरणासाठी ही परवानगी दिल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.

पीएफआय ही संघटना केरळस्थित मुलतत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेवर बंदी नसली तरीही ही केरळमधील आयसीस मॉड्यूलशी या संघटनेचे सदस्य सामील असल्याचा आरोप आहे. याचे काही सदस्य नंतर आयसीससाठी सीरिया आणि इराकलाही गेले होते. या सगळ्या कारणांमुळे पीएफआय संघटना एनआयएच्या रडारवर आहे. याशिवाय ठिकठिकाणी हिंसा भडकावणे आणि राजकीय हत्यांचा आरोपही पीएफआयवर आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 2, 2020, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading