मुंबई, 19 जुलै : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये अनुदान द्या, प्रती लिटर दुधाला तीस रुपये खरेदी दर द्या आणि दूध भुकटीकरिता प्रती किलो 50 रूपये अनुदान द्यावं, यासाठी सोमवार 20 जुलै रोजी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना दूध भेट व भाजपा महायुतीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने तातडीने दूध प्रश्नावर न्याय निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, रासपाचे महादेवराव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाई आठवले गटाचे अविनाशजी महातेकर, शिवसंग्रामचे विनायकराव मेटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिलजी बोंडे, सुरेशजी हळवणकर तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज रविवार 19जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखीलआंदोलनाची घोषणा केली असून 1 ऑगस्ट रोजी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध न घालता सरकारचा निषेध करावा असे आवाहन खोत यांनी केले आहे. 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व दूध उत्पादन शेतकऱ्यांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
रोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दुधाच्या प्रॉडक्ट्ची विक्री 10 ते 15 टक्के पर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वेळेत मिळण्यास अडचणी येत आहेत. तरी राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लीटर 10 रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दूध प्रति लिटर 30 रुपये दराने खरेदी करावे या सर्व मागण्या घेऊन रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष व भारतीय जनता किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.