मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अजितदादांची CBI चौकशीची भाजपकडून मागणी, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

अजितदादांची CBI चौकशीची भाजपकडून मागणी, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

'ते तिकडे गेले आणि काहींना आमदार की मिळाली काहींना मंत्रिपद मिळालं. त्यांच्यावर लागलेल्या चौकशी सुद्धा बंद झाली'

'ते तिकडे गेले आणि काहींना आमदार की मिळाली काहींना मंत्रिपद मिळालं. त्यांच्यावर लागलेल्या चौकशी सुद्धा बंद झाली'

'आता भाजप पक्षाचे नेते ठरणार का? कोणाची चौकशी करायची, कुणाला दोषी ठरवायचे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 जून: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. पण, 'आम्ही अशा चौकश्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Navab Malik) यांनी दिली.

एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना आता भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अजित पवार आणि अनिल परब यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी टीका केली आहे.

5 दिवस राज्यात पावसाची सुट्टी; पण आज पुण्यासह या जिल्ह्यांत कोसळणार सरी

'राज्यातील भाजप नेत्यांनी  अमित शहा यांच्याकडे अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. आता भाजप पक्षाचे नेते ठरणार का? कोणाची चौकशी करायची, कुणाला दोषी ठरवायचे. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही. आम्ही घाबरत नाही, भाजपचे काही नेते अडचणीत येणार आहे.  त्यामुळे भाजपकडून अशी मागणी केली जात आहे', असंही मलिक म्हणाले.

'काही लोकांना भावनिक राजकारण करायचे असते. कुर्बानी यावरून ते मत मांडतात, नाराजी असेल गैरसमज दूर करा, भावनिक राजकरण नको, असं म्हणत मलिक यांनी अबू आझमींना सल्ला दिला.

'विधानसभा अध्यक्षपद निवडणूक दोन दिवसाच्या अधिवेशन होईल.  राज्यपाल यांनी 12 विधान परिषद नेमणूक करावी आमची त्यांना विनंती आहे, असंही मलिक म्हणाले.

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा'

चंद्रकांत पाटील यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करावी, अशी प्रदेश भाजपची मागणी असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे.

मुलाच्या हातामध्ये फोन देणं पडलं महागात, वडिलांना कार विकून फेडावं लागलं कर्ज

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत असल्याचा चंद्रकांतदादांनी  दावा केला आहे.  याआधीही भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीबद्दल ठराव मांडण्यात आला होता. भाजपच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Amit Shah, CBI, Chandrakant patil, Maharashtra, Mumbai