70 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई मनपाने तरुणांचं मोफत लसीकरण करावे, भाजपची मागणी

70 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई मनपाने तरुणांचं मोफत लसीकरण करावे, भाजपची मागणी

Free vaccination भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला सोमवारी दुपारी भेटीसाठी वेळ दिली.

  • Share this:

मुंबई, 10 मे : मुंबई महापालिकेकडे (BMC) 70 हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळं त्यांनी रुग्णांना मोफत लसीकरण (Free Vaccination) करावं अशी मागणी भाजपनं मुंबईच्या महापालिका आयुक्तांकडे (Mumbai Municiple commissioner) केली आहे. भाजपनं मनपा आयुक्त इकबालसिंह चहल (Iqbal singh Chahal) यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. कोरोनामुळं त्यांना आधी भेट नाकारण्यात आली होती. पण भाजप नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर भेटीची परवानगी देण्यात आली.

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येवरून आणि इतर मुद्द्यांवरून सध्या महापालिका आणि भाजप आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगर पालिका कोरोनावर नियंत्रण आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडं भाजप मात्र महापालिका दाखवत असलेली आकडेवारी खोटी असल्याचा दावा करत आहे. त्यामुळं रविवारी भाजपच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांना भेटीची वेळ मागितली. मात्र अशा बैठकांना शासनानं बंदी घातली आहे असं सांगत त्यांना भेट नाकारण्यात आली होती. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नागरिकांच्या मागण्यांसाठी महापालिकेच्या दारावर आंदोलन करण्याची तयारी असल्याचं म्हटलं. त्यामुळं अखेर त्यांना वेळ देण्यात आली.

(वाचा-Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर मोफत होणार उपचार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा)

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला सोमवारी दुपारी भेटीसाठी वेळ दिली. या भेटीसाठी प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळानं मुंबईतील नागरिकांना मोफत लसीकरण करण्याबाबत आयुक्तांना निवेदन दिलं.

निवेदनातील प्रमुख मुद्दे

- मुंबई महापालिकेने मुंबईतील 18-44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे

- मुंबईत 18-44 वयोगटाचे 58 लाख 60 हजार नागरिक आहेत.

- दोन डोसचे 600 याप्रमाणे 350 कोटी रुपये या गटाला लसीकरणासाठी लागतील

- 350 कोटींचा हा भार मुंबई महानगर पालिकेने उचलावा

- त्यासाठी प्रस्ताव तयार करून तातडीने राज्य सरकारला पाठवावा

(वाचा-पुण्यातली चालती फिरती Plasma बँक, कोरोनावर मात केल्यानंतर 9 महिन्यांत 14 वेळा प्लाझ्मा दान)

45-59 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळताना त्रास होत आहे. त्यासाठी महानगर पालिकेने योग्य पद्धतीने नियोजन करावं आणि नागरिकांना दुसरा डोस मिळवून द्यावा असंही निवेदनात म्हटलं आहे. महापालिकेनं लसींचा साठा दडवून ठेवू नये नागरिकांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आणि  भाजपच्या नेत्यांमध्ये एक तासाहून अधिक काळ ही बैठक चालली.

Published by: Meenal Gangurde
First published: May 10, 2021, 9:41 PM IST

ताज्या बातम्या