आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, फडणवीसांवरच्या आरोपांना दिलं उत्तर

आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, फडणवीसांवरच्या आरोपांना दिलं उत्तर

'आदित्य ठाकरेच घटनेचं राजकारण करत आहेत. त्यांनी असं राजकारण करू नये'

  • Share this:

मुंबई 26 फेब्रुवारी : शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्याला उत्तर देत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना माफी मागा अशी मागणी केली होती. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांवर आता भाजपने पलटवार केलाय. भाजपने फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडीओच ट्वीट करून त्याला उत्तर दिलंय. त्याच भाषणात फडणवीस म्हणाले होते की, माझ्याकडून बांगड्यांचा झालेला उल्लेख हा महिलांना आवडणार नाही. त्यामुळे मी माझं वक्तव्य मागे घेतो. त्यानंतर त्यांनी शिवसेना मूग गिळून बसलीय का? असा सवाल केला होता.

फडणवीसांनी स्पष्टिकरण देत आपलं वक्तव्य मागे घेतल्यानंतरही आदित्य ठाकरेंनी अशी टीका केली. यावरून तेच राजकारण करत असल्याचं स्पष्ट होते असंही भाजपने म्हटलं आहे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. फडणवीसांनी शिवसेनेवर जी टीका केली होती त्यावरून आदित्य यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केलं होतं त्यावरून आदित्य यांनी निशाणा साधलाय. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नाही असंही ते म्हणाले.

भाजपने आणलेला सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभेत फेटाळला

आदित्य ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र तुम्ही भाषणात शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही अशी टीका केली होती. बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही.त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा...

सगळचं संशयास्पद...फक्त पाणी पिण्याचं निमित्त झालं आणि विद्यार्थ्यीनीचा जीव गेला

'बांगड्या' वक्तव्यावरून माफी मागा, आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका

First published: February 26, 2020, 2:19 PM IST

ताज्या बातम्या