'बिनकामाची पन्नाशी', उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर भाजपची घणाघाती टीका

'बिनकामाची पन्नाशी', उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर भाजपची घणाघाती टीका

युतीची काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेचा नवा संसार मांडला आहे.

  • Share this:

मुंबई,19 जानेवारी: युतीची काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेचा नवा संसार मांडला आहे. महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. नव सरकार स्थापन होऊन 50 दिवस झाले आहेत. तरी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेविरुद्ध माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असा राजकीय संघर्ष पेटला आहे. आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला 50 दिवस पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत सोशल मीडियावर भाजपाने 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील 50 दिवस आणि त्यावेळी फडवणीस यांच्या सरकारमधील महत्त्वाचे निर्णय याची तुलना करतात. फडवणीस सरकारविरुद्ध 'महाभकास आघाडी सरकार' असे भाजप महाराष्ट्रकडून tweet करण्यात येत आहे. फडवणीस सरकार यांनी या कवितेच्या माध्यमातून कोण कोणती सार्वजनिक कामे केली होती. कर्जमाफी जलयुक्त शिवार, शेतकरी धोरण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मंजुरी, नवी मुंबईतील विमानतळ आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न, यासह अनेक निर्णयांची यादीच केली आहे.

दुसर्‍या बाजूला महाबकास आघाडी सरकार असे म्हणत 'बिनकामाची पन्नाशी' असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या गेल्या 50 दिवसांतील कारभारावर टीका केली आहे. यात फसव्या कर्जमाफी सातबारा कोरा झालाच नाही. मंत्र्यांची दालनं खाते यावरच केवळ बैठका प्रशासनात सुस्ती मलाईदार खात्यांसाठी सरांची समस्ती भाजपला दूर ठेवण्यासाठी गतिमान विकास थांबून स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी महाबकास आघाडी सरकार आता स्वार्थाचे तोरण, अशा तिखट शब्दात ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. गेले काही दिवस ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सोशल मीडियातून देखील वारंवार टीका करत असताना दिसत आहेत. एकूणच पन्नास दिवसाचा कारभारावरून भाजपने सोशल मीडियात महाविकास आघाडी सरकार जरी म्हटलं असलं तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेपेक्षा उद्धव ठाकरेच टीकेचे सर्वाधिक केंद्रस्थानी दिसत आहेत.

First published: January 19, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading