लाच घेतल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेला 5 वर्षांची शिक्षा

लाच घेतल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेला 5 वर्षांची शिक्षा

लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि बिल्डर यांची युती असल्याने अशा भ्रष्ट लोकांवर अनेकदा कुठलीही कारवाई होत नाही. मात्र भानुशाली यांना शिक्षा झाल्याने नगरसेवकांना धक्का बसलाय.

  • Share this:

विजय देसाई, भाईंदर 11 डिसेंबर : भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांना लाचखोर प्रकरणात ठाणे न्यायालयाने 5 वर्ष कैद आणि 5 लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. भानुशाली या मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत. भाजपच्या नगरसेविका असताना भाईंदर येथील गाळ्यांच्या उंची वाढवण्यासाठी गाळ्याची मालकीण राधा पारेख यांच्याकडून त्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांची मांगणी केली होती. 6 जून 2014 रोजी ठाणे अँटीकरप्शन ब्युरोंनी 50 हजार लाच घेत असताना त्यांना अटक केली होती. आज न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय. भ्रष्टाचाराविरुद्ध भाजप मोठी लढाई लढत असताना पक्षाच्या नगरसेविकेलाच शिक्षा झाल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ उडालीय. भाईंदर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असतात. त्यात नियमांची राजरोसपणे पायमल्ली होत असते. त्याच्या असंख्य तक्रारी होत असतात. जमीन बळकावणं, सरकारी आणि महापालिकेच्याम मालकीच्या जागेवर इमारती उभारणं, खोटी कागदपत्रं तयार करणं, लवकर परवानगी मिळवणं यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचं बोललं जातं.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून भाजपचा खुलासा, खडसेंना दिलं उत्तर!

त्यामुळे उपनगरांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध बांधकाम उभं राहिलंय. बिल्डर स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून हे अशा जागांवर बांधकाम करतात. तर मोकळ्या जागांवर रातो रात झोपडपट्ट्याही उभ्या राहतात. त्यामुळे मुंबई आणि परिसरात झोपड्यांचं साम्राज्य तयार झालंय.

या नगरसेवकांचे बिल्डरांसोबतही लागेबंधे असतात. त्यामुळे आर्थिक फायदा होत असल्याने अशी बेकायदा कामे केली जातात. या परिसरात जमीनीचे भाव हे आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे त्याचे कोट्यवधींचे व्यवहार होत असतात. त्यातून होणार आर्थिक फायदा हा प्रचंड असल्याने अशी कामे केली जातात.

मराठी IPS अधिकारी करणार हैदराबाद Encounterची चौकशी

त्यातूनच अनेकदा प्रशासन आणि लोकप्रतीनिधी यांच्यात संघर्षही रंगतो. कडक धोरण स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याविरूद्ध सर्वच लोकप्रतिनिधी एकत्र येतात आणि त्यांच्या बदलीसाठी मागणी केली जाते. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि बिल्डर यांची युती असल्याने अशा भ्रष्ट लोकांवर अनेकदा कुठलीही कारवाई होत नाही.

मात्र अशा कामांसाठी पैसे मागणाऱ्या लोकांविरुद्ध थेट तक्रार करा असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या