भाजप विरुद्ध शिवसेना; आदित्य ठाकरेंना उद्घाटनापासून भाजप नगरसेवकानं रोखलं

भाजप विरुद्ध शिवसेना; आदित्य ठाकरेंना उद्घाटनापासून भाजप नगरसेवकानं रोखलं

ठाण्यात सेना भाजपात आलबेल आहे असं सांगणारे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वादाचं नाट्य घडल्याने दोनही पक्षांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 15 ऑगस्ट : विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीय. एका उद्यानाच्या उद्घाटनापासून भाजप नगरसेवकांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनाच रोखल्याने वाद झाला होता. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून भाजप नगसेवकांची समजूत काढली. मात्र हा वाद तात्पुरता शांत झाला असला तरी भाजप आणि शिवसेनेत ठाण्यात आलबेल नाही हे स्पष्ट झालंय.

दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये डान्सबारची छमछम, बारबालांवर पैशाचा पाऊस!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यात दुसऱ्यांदा गुरुवारी युवासेनाप्रमुख  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र याच उद्यानाचं पाच महिन्यांपूर्वी भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उद्घाटन केलं होतं.त्यावेळी या उद्यानाला स्वर्गीय वसंत डावखरे यांचं नाव देण्यात आले होते मात्र हे उद्घाटन अनौपचारीक असल्याचं सांगितलं जातंय.

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का? सदाभाऊंचा हल्लाबोल

पण पाच महिन्यानंतर या स्वर्गीय वसंत डावखरे यांचं नाव बदलून वनस्थळी उद्यान असं नाव देण्यात आलें. याच उद्यानाचे आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आदित्य ठाकरे कार्यक्रम स्थाळावरुन बाहेर पडताना ठाणे महानगरपालिकेचे भाजपा गटनेते नारायण पवार आणि इतर नगरसेवकांनी आदित्य ठाकरे यांना रोखत उद्यानाचे उद्घाटन राज्यमंत्र्यांनी आधीच केले असून या उद्यानाचे नाव स्वर्गिय वसंत डावखरेच ठेवावा असा आग्रह धरला.

बिबट्या मादी आणि तिच्या पिलाच्या भेटीचा चटका लावणारा VIDEO तुम्ही पाहिलाच पाहिजे

शेवटी प्रसार माध्यामांसमोर सेना भाजपाचे मतभेद समोर येऊ नये याकरता ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आणि उद्यानाचं नाव वसंत डावखरेच राहिल तसा ठराव पालिकेत मंजूर करुन घेऊ असं आश्वासन दिलं. मात्र आधी झालेले उद्घाटन अनौपचारिक होते हे उद्घाटन औपचारिक आहे असं सांगून समजूत काढली.

मात्र ठाण्यात सेना भाजपात आलबेल आहे असं बोलणारे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच हे सर्व घडल्याने ठाण्यात शिवसेना भाजपा मध्ये किती वाद सुरु आहेत ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 08:35 PM IST

ताज्या बातम्या