डोंबिवली : सेना शहरप्रमुख प्रकरणी महेश पाटील यांना अटक आणि जामीन

डोंबिवली : सेना शहरप्रमुख प्रकरणी महेश पाटील यांना अटक आणि जामीन

शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरींच्या तोंडाला काळं फासणारे भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांना अखेर डोंबिवली पोलिसांनी अटक केलीय

  • Share this:

12 मे : शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरींच्या तोंडाला काळं फासणारे भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांना अखेर डोंबिवली पोलिसांनी अटक केलीय. महेश पाटील यांच्यासह 4 जणांनाही अटक केली. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने महेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

गुरुवारी रात्री डोंबिवलीत शिवसेनेने रावसाहेब दानवेंनी केलेल्या असभ्य वर्तनाचा निधेष करण्यासाठी शहरात आंदोलन केलं. यावेळी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून त्याला चपलांचा हार घालण्यात आला. याच घटनेवरून शिवसेनेला अद्दल घडवण्यासाठी रात्री उशिरा भाऊ चौधरी यांच्या तोंडाला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलं होतं. या प्रकरणानंतर डोंबिवलीत सेना आणि भाजपमध्ये संघर्ष रंगलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 07:41 PM IST

ताज्या बातम्या