गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून भाजपचा खुलासा, खडसेंना दिलं उत्तर!

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून भाजपचा खुलासा, खडसेंना दिलं उत्तर!

तत्कालीन फडणवीस सरकारने गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी काहीही केलं नाही असंच खडसेंना सुचवायचं होतं. त्यामुळे प्रदेश भाजपने त्यावर आज मोठा खुलासा केलाय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 11 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं भाजपला जमलं नाही. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. आता भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरुवात केलीय. गेल्या पाच वर्षांपासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते. ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खडसे यांनी स्पष्टिकरणही दिलं होतं. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून त्यांना देवेंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यानंतर आता या स्मारकावरून राजकारण सुरू झालं. प्रदेश भाजपने आता यावर खुलासा करत काही पुरावेच सादर केले आणि भाजपला उत्तर दिलंय.

आप जिस स्कूल में पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, राऊतांनी शहांना सुनावलं

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर खडसे म्हणाले होते, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक आधीच करायला पाहिजे होतं. तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र पुढे फार काही झालं नाही. या स्मारकासाठी औरंगाबाद इथं जागाही मागतिली होती. हे स्मारक तातडीने पूर्ण करावं अशी मागणी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे स्मारक लवकरच करू असं आश्वासन दिलं आणि त्या भागात दौरा असेल तर स्मारकाच्या जागेलाही भेट देण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी IPS अधिकारी करणार हैदराबाद Encounterची चौकशी

तत्कालीन फडणवीस सरकारने या स्मारकासाठी काहीही केलं नाही असंच त्यांना सुचवायचं होतं. त्यामुळे प्रदेश भाजपने त्यावर आज मोठा खुलासा केलाय.

काय आहे खुलासा?

भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री गोपीनाथजी मुंडे यांचा उद्या जयंती दिन! औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्यातील भाजपा सरकारने पुढाकार घेतला. 19 सप्टेंबर 2019 रोजी सिडकोने या स्मारकासाठी लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स दिले. 25 नोव्हेंबर 2019 रोजी स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाच्या कामाचा कार्यादेश (Work Order) सुद्धा देण्यात आला. हे स्मारक 2 वर्षात पूर्ण व्हावे, असे भाजपा सरकारनेच निश्चित केले होते. हे काम लवकर पूर्ण होऊन स्मारक आकारास येईल, अशी आशा करू या! असं ट्वीट करत त्यासंबंधीचे काही कागदपत्रही सादर केले आहेत.

उद्या 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मोठी सभा आयोजित केलीय. त्यात त्या पुढच्या वाटचालीची घोषणा करणार आहेत. त्या सभेला भाजपचे सगळे नाराज नेते हजर राहणार असून त्या सभेकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 05:12 PM IST

ताज्या बातम्या