Home /News /mumbai /

भाजपला थेट सत्ता स्थापनेचा दावा करता येणार नाही, कशी असेल प्रक्रिया?

भाजपला थेट सत्ता स्थापनेचा दावा करता येणार नाही, कशी असेल प्रक्रिया?

भाजपने पहिली मतदान करत आपल्या 104 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

भाजपने पहिली मतदान करत आपल्या 104 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहेत.

    मुंबई, 22 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shide) यांनी शिवसेनेच्या 33 आमदारांसह बंड पुकारलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आहे. मात्र एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे नेते दिसल्याने आता 'ऑपरेशन लोटस' सुरु असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसह सत्तास्थापनेचा विचार केले तर ते सहज शक्य होणार नाही. सत्तास्थापनेची ही प्रक्रिया नेमकी कशी आहे हे समजून घेऊयात. कशी असेल प्रक्रिया? शिवसेनेतून फुटलेल्या गटाला घेऊन भाजप थेट सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही किंवा तसे करता येत नाही. यासाठी आधी विरोध पक्ष हे सरकार अल्पमतात असल्याचे पत्र राज्यपालांना देईल. त्यानंतर राज्यपाल विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देतील. त्यानंतर फ्लोवर टेस्टमध्ये विद्यमान सरकारचे भविष्य ठरेल. जर सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर विरोधकांना राज्यपालांकडे बहुत असल्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर बहुमताचा दावा करणाऱ्या गटाला बहुमत सिद्ध करायला राज्यपाल आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध केल्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल. Eknath Shinde : शिंदेंसोबत भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू, फडणवीसांनी 3 माणसांवर सोपवली जबाबदारी एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेणार? शिवसेनेच्या बंडखोर 33 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सूरत सोडून गुवाहाटीला दाखल झाले आहे.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला CISF ची सुरक्षा असणार आहे. भाजपची अखेर एंट्री, एकनाथ शिंदेंसोबत दिसले भाजपचे २ नेते शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त 17 आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: BJP, Eknath Shinde, Maharashtra News, Shivsena

    पुढील बातम्या