मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Rahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष! वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास

Rahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष! वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Assembly Speaker Election ) भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Assembly Speaker Election ) भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Assembly Speaker Election ) भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले आहेत.

मुंबई, 3 जुलै : एकनाथ शिंदे सरकारनं (Eknath Shinde) सरकारनं विधानसभेतील पहिली लढाई जिंकली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत Assembly Speaker Election ) भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले आहेत. नार्वेकरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. या निवडणुकीत नार्वेकरांना 164 तर साळवी यांना 107 मतं मिळाली.

कोण आहेत नार्वेकर ?

11 फेब्रुवारी 1977 रोजी जन्मलेले नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. त्यांना वयाच्या 45 व्या वर्षीच अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. नार्वेकर हे कायद्याचे पदवीधर (LLB) असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा त्यांचा जवळचा संबंध आहे. या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेल्या नार्वेकरांचा भाजपा हा तिसरा पक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर नार्वेकरांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी विधान परिषदेचे आमदार असलेले नार्वेकर 2019 मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत.

Assembly Speaker Election : शिंदे सरकारने मारली बाजी, अध्यक्षपदासाठी मिळवली 164 मतं

कायदेतज्ज्ञ आणि सर्वच पक्षात मित्रत्वाचे असलेले संबंध ही नार्वेकरांची खासियत आहे. अध्यक्ष म्हणून काम करताना आगामी काळात ही वैशिष्ट्ये त्यांच्या कामाला येतील. त्याचबरोबर विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे ते जावाई आहेत. राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग यंदा घडला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath Shinde, Shivsena, Vidhansabha