मतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी

मतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी

लोकसभेच्या उमेदवाराला नागरिकांनी चक्क दूषित पाणी प्यायला लावलं. मुंबईतल्या भाजपच्या प्रचारफेरीत हा किस्सा घडला.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : निवडणुकीच्या निमित्ताने मतं मागायला राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात दारोदारी फिरून उंबरे झिजवत आहेत. एरवी इतक्या वेळा न दिसणारे नेते प्रचाराच्या निमित्ताने आपल्या दारात आलेले पाहून मतदारसुद्धा त्यांच्यापुढे अडचणींचा पाढा वाचतात. आपल्या समस्या, आपले प्रश्न याच वेळी उमेदवार शांतपणे ऐकून घेताहेत, हे आता मतदारांना समजून चुकलं आहे. याचं प्रत्यंतर मुंबईतल्या भाजपच्या प्रचारफेरीत आलं. लोकसभेच्या उमेदवाराला नागरिकांनी चक्क दूषित पाणी प्यायला लावलं. भाजपचे उत्तर मुंबईतले उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या बाबतीत हा किस्सा घडला.

गोपाळ शेट्टी प्रचारासाठी मालवणी भागातल्या म्हाडा वसाहतीत गेले असताना स्थानिकांनी त्यांना होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी केल्या. नुसत्या तक्रारीच नाही, तर त्यांना आपल्या घरी येणारं पाणी प्यायलाही लावलं. गोपाळ शेट्टी यांनीही मतदारांचा प्रश्न मनापासून जाणून घेण्यासाठी निमूटपणे ते पाणी प्यायलं. फ्री प्रेस जर्नलने या संदर्भात वृत्त दिलं आहे. म्हाडाच्या या वसाहतीत इतकं अशुद्ध आणि दूषित पाणी येतं की, रहिवासी त्याचा वापर पिण्यासाठी करूच शकत नाहीत. इथले रहिवासी बाटलीबंद पाणी विकत घेऊन आपली तहान भागवतात. या पाण्याचा वापर भांडी विसळण्यासाठी किंवा वैयक्तिक स्वच्छतेसाठी केल्यावर काही जणांना त्वचारोग किंवा आजारही झाल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.दरम्यान या भागत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या 70 वर्षात बदलली नसल्यानं पाणीपुरवठा दूषित होत आहे. मी यावर तातडीने हालचाली करून परिस्थिती बदलण्यासाठी उपाययोजना सुरू केली असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं, असं मुंबई मिररने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

Loading...

मालवणी इथल्या म्हाडा वसाहतीत 65 फ्लॅट आहेत आणि 2500 पेक्षा जास्त मतदार आहेत. त्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे पाण्याची समस्या पोहोचवली आहे. पण अद्याप कोणीही त्यावर कायमची उपाययोजना केली नाही, असा रहिवाशांचा दावा आहे.


VIDEO : उदयनराजेंनी असं दिलं मुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...