• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार!

ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार!

महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजप नेत्यांची बैठक झाली

 • Share this:
  मुंबई, 23 फेब्रुवारी : महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला  भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकरण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पीक कर्जाव्यतिरिक्त कुठल्याही कर्जाची माफी केली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसंच कर्जमुक्तीचं नाही तर कर्जमाफीही या सरकारनं दिलं नसल्याचं म्हणत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षानं शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सरकारला लक्ष केलंय.  दरम्यान, महाविकास आघाडीत एकमत नसल्यानं आधी त्यांनी संवाद साधावा अस म्हणत भाजपनं चहापानावर बहिष्कार टाकल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, राज्यात तीन पक्ष असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे.  महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर दीर्घकालीन असलेलं पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. या अधिवेशनात महाविकास आघाडीतील अन्य त्यांचा एकत्रित समन्वय किती आहे एकजूट किती आहे हे दिसणार आहे. तर दुसरीकडे विरोधक बाकावरील विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक पद्धतीने शिवसेना मित्रत्व सोडून गेल्यानंतर महा विकास आघाडी स्थापन झालेल्या या सरकारवर तुटून पडणार हे दिसू लागले आहे.
  Published by:sachin Salve
  First published: