माझ्यावरील आरोप खोटे-विनोद शेलार

माझ्यावरील आरोप खोटे-विनोद शेलार

  • Share this:

सुनिल महाडेश्वर, प्रतिनिधी

मुंबई, 26 सप्टेंबर : माजी नगरसेवक आणि विद्यमान उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्याविरोधात एका महिलेनं विनयभंगाचा आरोप केला होता. मात्र विनोद शेलार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्यावरील लावलेले आरोप धांदाट खोटे आहे असा दावा विनोद शेलार यांनी केला.

विनोद शेलार यांनी गर्दीत विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सदर महिला पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. या प्रकरणावर विनोद शेलार यांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. त्यातून हा प्रकार घडला असावा अशी प्रतिक्रिया विनोद शेलार यांनी दिली.

आतापर्यंत कुठे-कुठे वापरलं गेलं तुमचं आधार कार्ड, असं घ्या जाणून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2018 09:00 AM IST

ताज्या बातम्या