मुंबई महापौर पदाच्या शर्यतीतून भाजपची माघार, आता लक्ष्य...

मुंबई महापौर पदाच्या शर्यतीतून भाजपची माघार, आता लक्ष्य...

विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र राजकारण करणार नाही असे सांगत भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवणार नसल्याचे सांगितले.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवरच मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक होत आहे. 22 नोव्हेंबरला मुंबईच्या महापैर पदासाठी निवडणूक होईल. त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सध्या मुंबईचे महापौर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार उतरणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही. मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही!

राज्यात युतीचं बिनसल्याचं भाजपकडून जाहीर कऱण्यात आलं. त्यानंतर आता मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, भाजपकडून महापौरपदासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची चर्चा होती. पण भाजपने आता आपण महापौर पदाची निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर सेनेचाच महापौर होईल.

बीएमसीमध्ये सेनेनं 84 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 82 जागा मिळवल्या होत्या. काँग्रेसचे 31 तर राष्ट्रवादीचे 7, समाजवादी पक्षाचे 6 आणि अपक्ष 6 नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष 6 नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला होता.

राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते...

Published by: Suraj Yadav
First published: November 18, 2019, 11:57 AM IST
Tags: BMCmumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading