मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बला आशिष शेलारांचे सडेतोड प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले Ashish Shelar

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बला आशिष शेलारांचे सडेतोड प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले Ashish Shelar

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बला आशिष शेलारांचे सडेतोड प्रत्युत्तर

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बला आशिष शेलारांचे सडेतोड प्रत्युत्तर

Ashish Shelar on Nawab Malik allegation: पत्रकार परिषद गंभीर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 10 नोव्हेंबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नवाब मलिकांनी (Nawab Malik) पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी आरोपांचा हायड्रोजन बॉम्ब फोडताच भाजपने पत्रकार परिषद घेत या आरोपांचं खंडन करत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे लवंगीही लावू शकले नाहीत.

नवाब मलिक यांची घालमेल इतकी होती का हायड्रोजन सोडा त्यांना आता ॲाक्सिजनची गरज भासणार आहे. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे आज लवंगी सुद्धा लावू शकले नाही. त्यांनी मोठ मोठ्या गोष्टी सांगून त्याचा संबंध फडणवीस यांच्याशी लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काहीच तथ्य नाही. संपूर्ण राज्यातील, तीन पक्षाची सत्ता वापरून फडणवीसांना लागणारे तर सोडा पण त्यांना चिकटणारे ही आरोप हा करू शकले नाही.

मुन्ना यादव आणि हाजी अराफत आमचे पदाधिकारी आहेत. तुमचे सरकार आहे तुमचे गृहमंत्री आहेत. जर गंभीर गुन्हे होते तर मग यांना तुम्ही ताब्यात घेतले का नाही? इमरान आलम शेख हा तर काँग्रेसचा सचिव होता आणि आता तुम्ही बोलताय त्याचवेळी तो तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. आरोप करा आणि पळून जा असा प्रयत्न चालू आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

वाचा : अखेर मलिकांनी हायड्रोजन बॉम्ब फोडलाच

रियाज भाटीचा संबंध कुणाकुणाशी आहे? फोटोचा धंदा सुरू करू नका, कोणत्या मोठ्या नेत्याने त्याला क्रिकेटमध्ये आश्रय दिला? त्याचे नाव वाझे वसुली प्रकरणात समोर आले आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच त्याला पळवले नाही ना? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

आशिष शालार पुढे म्हणाले, आम्हाला नवाब मलिकांच्या मानसिक आरोग्याची काळजी वाटते. त्यांना हर्बल वनस्पतीचा पुरवठा थांबला असेल. नवाब मलिक राजकारणाच्या नीच पातळींवर उतरू नका. अल्पसंख्यांक लोकांना बदनाम करण्याचे काम तुम्ही करताय का? आर्यन आणि शाहरूख ला नवाब मलिक यांनी अडचणीत आणले. त्यांनी अस्लम शेख यांचे नाव घेतले त्यांना अडचणीत आणले. आणखी एका वक्तीचे नाव पुढे यावे म्हणून ते असे वागत आहे. याची दखल अल्पसंख्याक समाजाने घेतली पाहिजे.

वाचा : नवाब मलिक यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडताच नवाब मलिकांनी केलं 'हे' Tweet

काय म्हणाले होते नवाब मलिक?

बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी इम्रान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवलेल्या हाजी अराफत शेख याचा छोटा भाऊ आहे. हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात घेत अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं. नागपुरातील मुन्ना यादव याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदावर बसवलं. हैदर आझम हा बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो. याच्या दुसऱ्या पत्नीवर बनावट कागदपत्रांच्या संदर्भात मुंबईतील मालाड पोलिसांत गुन्हा दाखल होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून फोन गेला होता असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

वाचा : 'देवेंद्र फडणवीसांनी रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं'

बनावट नोट प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला

नवाब मलिकांनी म्हटलं, अत्यंत गंभीर आरोप करत आहे मी देवेंद्र फडणवीस तुमच्यावर, जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली.

बनावट नोटांचं कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद वाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे. 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले गेले. मुंबईत एक पुण्यात एकाला अटक केली. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख आणि नवी मुंबईतून एकाला अटक केली. मात्र, 14 कोटी 56 लाख पकडले गेले आणि 8 लाख 80 हजार सांगत प्रकरण दाबलं गेलं असंही नवाब मलिकांनी म्हटलं.

First published:

Tags: Ashish shelar, Devendra Fadnavis, Nawab malik