मुंबई, 30 डिसेंबर: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून शिवसेनेनं (Shiv Sena) भाजपवर (BJP) आज पुन्हा टीकेची तोफ डागली. शिवसेनेनं भाजप नेत्यांवर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
भारतीय राज्य घटनेचे भाजप कसं उल्लंघन करतं आहे आणि स्वत: च नवीन घटना तयार करून आगपाडख करत असल्याची टीका करण्यात आली आहे. आता त्यावरून भाजप नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला आहे.
हेही वाचा...राजकारणात नवा ट्विस्ट! आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल
'प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!', अशा शब्दांत आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे.
प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय?
गाव का गोळा करावा लागतोय?
ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय,तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत.
चला हवा येऊ द्या!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 30, 2020
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varash Raut) यांना अंमलबजावणी संचनालयानं नवे समन्स बजावले आहेत. येत्या 5 जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असे निर्देश वर्षा राऊत यांना देण्यात आले आहेत. त्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात..?
EDची भीती दाखवून घटनेवर बोट ठेवणारे भाजप नेत्यांना राज्यपाल नियुक्तं आमदारांच्या निर्णयावर मात्र त्याच घटनेचा विसर पडत असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. आजच्या सामना अग्रलेखात भाजपवर शिवसेनेने जहरी बाणांचा वर्षावच केलांय. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण आता आणखिनच तापणार यात शंका नाही. ED वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडलं पाहिजं, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.
'कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही. सीबीआय (CBI), ईडी (ED) सारख्या संस्थांचे अध:पतन सध्या जोरात सुरू आहे. हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूनत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या नव्या घटना समितीचा विजय असो डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागत घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!', अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.
हेही वाचा...कंगनाचा 'तो' व्हिडीओ ट्वीट करून काँग्रेस नेत्यानं NCB कडे कारवाईची मागणी
ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग 2020 मध्ये फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? कुणा कुडमुड्या ज्योतिषाने मार्च-एप्रिलचा मुहूर्त दिला असेल तर तो मूर्खपणाच ठरेल. त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकविण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.