आमचा 'काळा बाजार' तर सोनियांशी सलगी हा 'गोरा बाजार' का, भाजपचा सेनेला टोला

आमचा 'काळा बाजार' तर सोनियांशी सलगी हा 'गोरा बाजार' का, भाजपचा सेनेला टोला

आमच्या दृष्टीने आणीबाणीचा दिवस काळा दिवस होता पण शिवसेनेला तो वाटत नाही

  • Share this:

मुंबई,24 नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी बोलणे आमचा 'काळा बाजार' तर सोनिया गांधी यांच्याशी सलगी हा 'गोरा बाजार' का, असा सवाल भाजपचे नेते आशीष शेलार यांनी करत शिवसेनेला टोला लगावला आहे. आशीष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. भाजपकडे किमान 170 किंवा त्यापेक्षा अधिक संख्याबळ असून 30 नोव्हेंबरला आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू. तसेच शिवसेनेशिवाय स्थायी सरकार स्थापन करून स्थिर सरकार म्हणून काम करेल, असा दावा शेलार यांनी केला आहे.

आशीष शेलार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...

- संपूर्ण महाराष्ट्रात सकारात्मक प्रतिक्रिया आल्या

-जनतेनं जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार

- किमान 170 बहुमताचा आकडा जिंकू

- शिवसेनेशिवाय स्थायी सरकार स्थापन करून स्थिर सरकार म्हणून काम करेल.

- आम्ही प्रातः शाखेत जाणारे आहोत.

- राम प्रहर काळोखा वाटतो याचा महाराष्ट्राला दुःख आहे

-चोरुन केलेलं म्हणजे काळ्या काचा लावून घेतलेली अहमद पटेल यांची भेट

-सोनिया गांधींशी केलेली सलगी हा सेनेच्या दृष्टीनं गोरा बाजार आणि अजित पवार यांच्याशी केलेली सत्ता स्थापना काळा बाजार वाटतो

-काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात सिल्वर ओक येथे दाखल

-शरद पवार, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात भेट

- आमच्या दृष्टीने आणीबाणीचा दिवस काळा दिवस होता पण शिवसेनेला तो वाटत नाही

-30 तारखेला आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू

- संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली

-त्याबाबतीत उत्तर देताना अगोदरच मी स्पष्ट करतो

-जमेल त्या घाणेरड्या भाषेत उत्तर द्यायला मी संजय राऊत नाही

-काल देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर एक सकारात्मक वातावरण तयार झाले

-आम्ही जनतेचे काम करणारी माणसे आहोत आम्ही हाॅटेलच्या लाॅबीत दिवसभर बसून राहणारे नाही

-राज्यपालांनी आम्हाला ३० नोव्हेंबर पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली आहे

-किमान 170 किंवा त्यापेक्षा अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे

-सकाळी शपथविधी झाला त्यावर काही लोकांनी टीका केली

-आम्ही शपथ घेतली ती रामप्रहराची वेळ होती जे रामालाच विसरले त्यांना रामप्रहार काय कळणार

- भाजप कायदेशीर बाबी पूर्ण करत आपलं पाऊल टाकत आहे

- बौद्धिक खेळ करुन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न संजय राऊत करताय

First published: November 24, 2019, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading