मुंबई, 17 ऑगस्ट : 'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत,' असे उद्गार काढणारे आणि गेल्या वर्षीच भाजपवासी झालेले विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे प्रवक्ते करण्यात आलं आहे. तसंच गेल्याच वर्षी भाजपवासी झालेले धनंजय महाडिक यांच्यावरही पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीचं शेवटच्या क्षणी तिकीट मिळवणारे राहुल नार्वेकर यांनाही प्रवक्तेपद देण्यात आलं आहे. भारती पवारही गेल्याच वर्षी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये आल्या होत्या. त्या नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याकडेही भाजपकडून जबाबदारी सोपवली आहे.
प्रदेश भाजपाच्या प्रवक्ते व पॅनेलिस्टची घोषणा, कुणाला मिळाली संधी?
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून आज 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्य प्रवक्ता - केशव उपाध्ये
प्रवक्ता –
खा.भारती पवार - उत्तर महाराष्ट्र,
आ.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र,
आ. राम कदम – मुंबई,
शिवराय कुलकर्णी – विदर्भ,
एजाज देखमुख – मराठवाडा,
भालचंद्र शिरसाट – मुंबई,
धनंजय महाडीक – प. महाराष्ट्र,
राम कुलकर्णी – मराठवाडा,
श्वेता शालिनी – पुणे,
अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.
पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य -
गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil