खुर्चीचं भांडण मिटेना, आदित्य ठाकरेंसमोरच भाजप-शिवसेना आमदारांमध्ये जुंपली

खुर्चीचं भांडण मिटेना, आदित्य ठाकरेंसमोरच भाजप-शिवसेना आमदारांमध्ये जुंपली

...आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये कोण खुर्चीवर बसणार यावरून वाद झाला.

  • Share this:

मुंबई 21 जानेवारी : मुंबईत आज जिल्हा नियोजन बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीतच पालकमंत्री असलम शेख यांच्या समोर भाजपा आणि शिवसेना आमदारांमध्ये खुर्चीवरून मोठा वाद झाला. पालकमंत्री असलम शेख यांच्या जवळ आदित्य ठाकरे एका बाजूला बसले होते. दुसऱ्या बाजूला मोकळ्या खुर्चीवर भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर हे बसण्यास गेले गेले होते. त्यावर शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि मनीषा कायंदे यांनी हरकत घेतली. मुंबईतील सर्वात जेष्ठ आमदार म्हणून कोळंबर हे पालकमंत्र्यांच्या जवळ खुर्चीवर बसतील असा सूर भाजपाच्या इतर लोकप्रतिनिधींनी  या बैठकीत लावला. त्यानंतर शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये कोण खुर्चीवर बसणार यावरून वाद झाला.

या बैठकीमुळे काही काळ तणाव देखील निर्माण झाला. त्यामुळे काही क्षण बैठक स्थगिती झाली. अखेर पालकमंत्री असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. पण मुद्दा उपस्थित होतोय जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांवर शिवसेना-भाजप लोकप्रतिनिधी यांच्यातील मतभेद एक वेळ समजून घेतील पण खुर्चीवरून लोकप्रतिनिधींचा वाद ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे.

'नाईट लाईफ'म्हणजे फक्त दारु पिणं, भाजपच्या नेत्याचं वक्तव्य

या आधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानापामानाचं नाट्य रंगल्याच्या बातम्या आल्या होत्या. राज्यात तीन पक्षांचं सरकार असल्याने प्रत्येक पक्षाचे नेते हे आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे अशा वादांच्या घटना कायम बाहेर येत आहेत. या आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण याच्यातला वाद गाजला होता. त्यानंतरही अनेक वाद चव्हाट्यावर आले होते.

 जुळ्यांना रस्त्यावर टाकणारी आई सापडली, प्रेम प्रकरणातून झाली होती मुलं

अशा वादांमुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतो त्यामुळे असे वाद टाळावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दिल्या होत्या. मात्र या सूचनेचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये.

 

First published: January 21, 2020, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading